जिल्हा दूध संघाच्या सात मतदारसंघातील 17 उमेदवारांच्या अर्जावर हरकती

दहा उमेदवारांनी नोंदविले लेखी आक्षेप; सोमवारी वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द होणार
जिल्हा दूध संघाच्या सात मतदारसंघातील 17 उमेदवारांच्या अर्जावर हरकती

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा दूध संघाच्या (District Milk Union) निवडणुकीत (election) उमेदवारी अर्ज छाननीमध्ये (scrutiny of candidature applications) एकूण सात मतदारसंघामध्ये (constituency) 10 उमेदवारांनी (Candidates)प्रतिस्पर्धी (competitor) 17 उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप (Objection to application of candidates) नोंदविले. यात आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे या दोन्ही आमदारांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या आहेत. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांमार्फत (Election Adjudicating Officers) वैध उमेदवार (valid candidate list) यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 28 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

जिल्हा दूध संघाच्या सात मतदारसंघातील 17 उमेदवारांच्या अर्जावर हरकती
जळगावातील रस्ते कामांच्या टेंडरमध्ये कोट्यावधीचा घोटाळा!

जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत एकूण 179 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, संजय पवार, वाल्मिक पाटील यांच्यासह 17 जणांच्या उमेदवारी अर्जावर हरकती घेण्यात आल्या. या हरकतींवर सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली.

जिल्हा दूध संघाच्या सात मतदारसंघातील 17 उमेदवारांच्या अर्जावर हरकती
विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे सोमवारी सुगम गायन स्पर्धा

या उमेदवारांच्या अर्जावर घेतली हरकत

मुक्ताईनगर तालुका मतदार संघातील उमेदवार मंदाकिनी खडसे यांनी त्या मतदारसंघात उमेवारी अर्ज भरणार्‍या आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर हरकत घेतली. त्यांच्यासह उमेदवार रमेश पाटील आणि सुभाष पाटील यांच्याविरोधात देखील त्यांनी लेखी हरकत नोंदविली. जळगाव तालुका मतदार संघातील उमेदवार खेमचंद महाजन यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात आ. मंगेश चव्हाणांविरोधात हरकत नोंदविली.

धरणगाव तालुका मतदारसंघात जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी त्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरणारे वाल्मिक पाटील आणि ओंकार मुंदडा यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली तर ओंकार मुंदडा यांनी देखील संजय पवारांच्या उमेदवारी अर्जावर हरकत नोंदवली. रावेर तालुका मतदार संघात जगदीश बढे यांनी गीता चौधरी, मिलींद वायकोळे आणि सुभाष सरोदे या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जावर हरकत घेतली आहे.

जिल्हा दूध संघाच्या सात मतदारसंघातील 17 उमेदवारांच्या अर्जावर हरकती
काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांवर कारवाईबाबत 9 डिसेंबरला सुनावणी

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात उदय अहिरे यांनी आमदार संजय सावकारे, श्रावण ब्रम्हे यांच्या अर्जावर हरकत घेतली. विमुक्त जाती- जमाती मतदारसंघात विजय रामदास पाटील यांनी अरविंद देशमुख यांच्या अर्जावर हरकत घेतली.

भडगावमध्ये डॉ.संजीव पाटील यांनी संदीपकुमार पाटील यांच्याविरोधात हरकत घेतली तर चोपडा तालुका मतदार संघात रोहित निकम यांनी इंदिराबाई पाटील आणि रविंद्र पाटील यांच्याविरोधात तर रविंद्र पाटील यांनी रोहित निकम यांच्या अर्जावर हरकत नोंदवली. या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली असून सोमवारी निर्णय दिला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com