
रावेर Raver|प्रतिनिधी-
पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) शौचालय घोटाळ्यातील (toilet scam) अटक (Arrested) करण्यात आलेल्या ८ आरोपींची (accused) पोलीस कोठडी मंगळवारी संपली असता,पुन्हा रावेर न्यायालयात हजर केले असता,चार दिवसाची पोलीस कोठडी (Police cell) सुनावण्यात आली आहे. तर मंगळवारी झालेल्या युक्तिवादात तपास अधिकारी यांनी आरोपीकडून अपहारातील रक्कम हस्तगत (Seized the embezzled amount) करण्याच्या मुद्द्यावर व आरोपी तपासात (accused was not cooperating) सहकार्य करत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले ,त्याअनुषंगाने या गुन्ह्याची व्याप्ती पाहता,आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी (Police cell) सुनावण्यात आली आहे. तर यात सोमवारी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना देखील चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
शौचालय घोटाळ्यात संशयास्पद लाभार्थी असलेले १२६ जण पोलिसांच्या रडारवर आहे. त्यापैकी मुख्य सूत्रधार पंचायत समिती गट समन्वयक समाधान निंभोरे,लेखाधिकारी लक्ष्मन पाटील(रावेर),विवरे खुर्द ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाबुराव पाटील,रवींद्र रायपूरे,नजीर तडवी,रुबाद तडवी,हमीद तडवी सर्व रा.पाडळा,या ८ जणांना या पूर्वीच ताब्यात घेतले आहे.तर सोमवारी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.यात सतीश पाटील खिरोदा व महेंद्र गाढे खिरवड यांचा समावेश आहे.
त्यापैकी रावेर पोलिसांनी ८ जणांना या पूर्वीच ताब्यात घेतले आहे.तर सोमवारी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात सतीश पाटील खिरोदा व महेंद्र गाढे खिरवड यांचा समावेश आहे.
सोमवारी न्या.अनंत बाजड यांच्यापुढे १० आरोपींना हजर केले असता,त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान आता अटकेतील आरोपींची असलेले बँक खाते गोठवण्यात येणार असून यासाठी तपास अधिकारी सपोनि शीतलकुमार नाईक यांनी संबंधित बँकांना नोटीस बजावली आहे.