स्वच्छतेत भारतात चौथा क्रमांक, तरीही गल्लीत केमिकलयुक्त भंगाराचा वास : यावल नगरपरिषदेला येईल का जाग ?

स्वच्छतेत भारतात चौथा क्रमांक, तरीही गल्लीत केमिकलयुक्त भंगाराचा वास : यावल नगरपरिषदेला  येईल का जाग ?

अरुण पाटील

यावल Yaval

भारतात (India) स्वच्छतेमध्ये (cleanliness) चौथा नंबर (Number four) मिळवणाऱ्या यावल नगरपरिषदेच्या (Municipal Council) कार्यक्षेत्रात असलेल्या सातोद रोड सब स्टेशन (Sub Station) समोर भंगार (Scrap) आणि केमिकल (chemicals) मुळे रहिवास प्रयोजन असलेल्या नागरिकांना (citizens) आरोग्यास धोका (Threat to the health) निर्माण झाला आहे. यावल नगरपरिषदेने तातडीने हे गोडाऊन सीलबंद (Godown sealed) करून या ठिकाणचे केमिकल चा वास येत असल्याने येथील हा धंदा बंद करावा व गोडाऊन मालकावर कायदेशीर कारवाई (Legal action)करण्यात यावी अशी मागणी अरुण रामदास बारी,(Arun Ramdas Bari) सह दहा नागरिकांनी जिल्हाधिकारी (Collector) जळगाव सह यावल नगर परिषदेकडे (Municipal Council) करूनही कुठलीही कारवाई होत नसल्याने एक खेद व्यक्त करण्यात येत आहे.

यावल शहरातील सातोद रोड वरील बिन शेती गट नंबर 69 प्लॉट नंबर 7,8 व 10 यामध्ये भंगार मालाची गोडावून आहे सदर गोडाऊन हे शेख अन्वर सेट गुलाब खाटीक ,शेख अफसर शेख अकबर खाटीक, फिरोज खान अजीज खान यांचे मालकीचे असून भंगार मालाचे गोडाऊन साठी या वरील तिन्ही व्यक्तींनी सदरचे भंगाराचे गोडाऊन साठी नगरपालिका यावल यांच्याकडून ना हरकत दाखला घेतला आहे किंवा काय ? कामकाज सुरू केलेले आहे परंतु नगरपालिका यावल यांच्याकडून माहिती मागवली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असून प्लॉट धारकांना या ठिकाणी नाना प्रकारचे भंगार येत असल्यामुळे आणि त्यापासून दुर्गंधी येते व कधी केमिकलचा वास येतो.

बऱ्याचदा आग लागण्याच्या छोट्या घटना घडलेल्या आहेत सदर भंगार गोडाऊन हे त्यांच्या प्लॉट धारकांच्या सामायिक वापराच्या ओपन स्पेस मध्ये सुद्धा माल ठेवला जात आहे एक प्रकारे भंगार गोडाऊन धारक हे येनकेन प्रकारे रहिवासासाठी प्रयोजन असलेल्या नागरिकांना त्रास देत असून त्यांना धमकावले जाते असे तक्रारीत नमूद केले आहे.
भंगार गोडावून सुरू करणे अगोदर प्लॉट धारकांची नाहरकत तसेच नगरपालिकेची नाहरकत परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक असताना सदरचे गोडाऊन धारक हे बेकायदेशीरपणे दांडगाईने सदरचे गोडाउन मध्ये उघड्यावर भंगार ठेवत आहेत. या भंगार मुळे जीवितास धोका निर्माण झाला असून त्याठिकाणी व्यावसायिक परवाना घेतलेला नाही. नगरपालिकेने व्यावसायिक परवाना दिलेला नाही असे तक्रारदारांचे तक्रारीमध्ये नमूद केलेले आहे.


सदर गोडाऊन धारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच सदर चे गोडाऊन सील करण्यात येऊन ते बंद करण्यात यावं व गोडाऊन मधील भंगार जप्त करून तो नष्ट करण्यात यावा व आमच्या जीवितास धोका होणार नाही याबाबत त्यांना समज देण्यात यावी अशी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या तक्रारीत अरुण रामदास बारी, सुरेखा अर्जुन बारी, शुभांगी एकनाथ बारी, आयोध्या राम अर्जुन बारी ,सौ अनिता सुखदेव बारी, दगडू रूपा बारी, विठ्ठल रूपा बारी ,शांताराम चिंधु बारी, संजय गोपाळ बारी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

नगरपरिषदे ने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास आंदोलन करावे लागेल असा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.

सदर प्रकरणाबाबत सखोल माहिती घेतली असता 23 मार्च 2015 रोजी नगर परिषदेकडून ना हरकत दाखला देण्यात आलेला आहे. त्यात शेख अफसर शेख अकबर खाटीक यांना तत्कालीन मुख्याधिकारी यांनी गट नंबर 59 प्लॉट नंबर 8 मध्ये पत्री शेडचे बांधकाम करण्यासाठी नवीन थ्री फेज वीज कनेक्शन घेण्यासाठी काही अटींवर ना हरकत दाखला देण्यात आलेला होता त्यात व्यवसायाबाबत आजूबाजूचे तक्रारी आल्यास त्याची जबाबदारी अर्जदारावर राहील, व दूर करणे बंधनकारक राहील , म्यु .पल व प्रचलित कायदे हे अर्जदारावर बंधनकारक राहतील, नगरपरिषद ज्यावेळी सूचना अगर हुकुम करील त्यावेळी अर्जदार यांनी पालन करण्याचे आहे, नगरपालिका अधिनियम 1965 महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायदा कल सन 1966 मधील तरतुदी अधीन राहून नाहरकत दाखला प्रमाणपत्र देण्यात येत आहे .

या कामी मालकी हक्काबाबत व अन्य कोणताही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्ज दारावर राहील ,स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने अर्जदाराने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे . या कामी सरकारी खाजगी अथवा तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अर्ज दारावर राहील नगरपरिषदेवर राहणार नाही .सदर जागेत कोणतेही नवीन बांधकाम रितसर परवानगी घेतल्याशिवाय करण्यात येणार नाही . व्यवसायासाठी आवश्यक ते शासकीय अगर अन्य दाखले घेऊनच व्यवसाय करणे आवश्यक आहे, याकामी दिलेली माहिती अगर सादर केलेली कागदपत्रे खोटी व दिशाभूल करणारी आढळल्यास वरील अटीचा भंग केल्यास दिलेले ना हरकत पत्र त्वरित रद्द करण्यात येईल असे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी 23 मार्च 2015 रोजीच्या जावक नंबर यावल नगर परिषद 382 /15 नुसार ना हरकत दाखला दिलेला होता


मात्र याठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असल्याने स्वच्छतेचे प्रमाणपत्र मिळवून भारतामध्ये चौथा नंबर मिळू पाहणाऱ्या या नगरपरिषदेने आता गावातील नागरिकांची जीवन धोक्यात येणार नाही यासाठी ही पावले उचलावीत अशी मागणी अरुण बारी सह इतरांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com