राष्ट्रवादीत आता माझाही वेगळा गट

आ.एकनाथराव खडसे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या
राष्ट्रवादीत आता माझाही वेगळा गट

जळगाव । Jalgaon

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक-दोन नव्हे तर 50 आमदारांचे 50 गट आहेत. त्यात आता माझाही एक वेगळा गट असल्याचे विधान राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे (NCP leader Eknathrao Khadse) यांनी केले. दरम्यान, खडसेंच्या या विधानाने पक्षातीलच पदाधिकार्‍यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी माध्यमांनी आ. खडसे यांना काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि फडणवीस यांच्या भेटीसंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, राजकारणात विचार वेगळे असले तरी एकमेकांच्या भेटी ह्या काही विशेष बाब नाही. मी देखिल दोन दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती.

विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्र्याचीही मी भेट घेणार आहे. त्यामुळे अशा भेटी होतच राहतात असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीतील गटबाजीबाबत बोलतांना आ. खडसे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीत 50 आमदारांचे 50 गट आहे. माझाही त्यात वेगळा एक गट आहे. पक्षात काम करीत असतांना विचार वेगळे असू शकतात पण पक्ष हा एकसंघ असतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com