आता गुलाबरावच म्हणाले ‘50 खोके, एकदम ओक्के’

तेली समाज गुणवंतांच्या कार्यक्रमात उडाले हास्याचे फवारे
आता गुलाबरावच म्हणाले ‘50 खोके, एकदम ओक्के’

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्यात आत्तापर्यंत विरोधक (protestors chanted) ‘ 50 खोके, एकदम ओक्के’ ('50 boxes, okke okke) ह्या घोषणा देत होते. सोमवारी मात्र तेली समाज गुणगौरव सोहळ्यात (Teli Samaj merit ceremony) शिंदे गटाचे मंत्री ना. गुलाबराव पाटील (Shinde Group Minister Gulabrao Patil) यांनी आपल्या भाषणात ‘50 खोके, एकदम ओक्के ('50 boxes, okke okke)’ वाले इथे बसले असल्याचे सांगताच कार्यक्रमात जोरदार हास्याचे फवारे उडाले. दरम्यान ‘कुणी टिका करण्याआधीच मोकळे सांगितलेले बरे’ असेही ते सांगण्यास विसरले नाही.

प्रदेश तेली महासंघातर्फे सोमवारी लेवा भवन येथे गुणवंत विद्यार्थांचा सत्काळ सोहळा मोठ्या थाटात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन,अखिल भारतीय तेली समाजाचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, शिरीष चौधरी, संतोष चौधरी, विष्णू भंगाळे यांच्यासह गुलाबराव वाघ, शरद तायडे यांच्यासह समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्याहस्ते श्री संतांजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जीवनात चढ-उतार येत असतात. त्यामुळे घाबरून न जाता, संघर्ष करायला हवा. संघर्षाशिवाय माणूस मोठा होत नाही. तरूण-तरूणींनी मोठ्या पदावर गेल्यानंतर आपली मागची पाऊल वाट विसरू नका असेही त्यांनी सांगितले.

500 हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव

कार्यक्रमात तेली समाजातील 500 हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. के.डी. चौधरी, प्रशांत सुरळकर, निर्मला चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com