बळीरामपेठ, नवीपेठेतील 10 दुकानदारांना नोटीसा

कोरोनाचे नियमांचे उल्लंघन; महापालिकेची कारवाई
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरात कोरोना नियमांचे corona rules उल्लंघन Violation करणार्‍या 10 दुकानदारांवर गुरूवारी दुपारी दंडात्मक कारवाईच्या Punitive action नोटीसा बजावण्यात आले आहे. 24 तासाच्या आत लेखी खुलासा न दिल्यास दंड आकारण्यात येईल असा इशारा महापालिकेचे Municipal Corporation अतिक्रमण विभागाचे Encroachment Deputy Commissioner उपायुक्त श्याम गोसावी Shyam Gosavi यांनी दिला आहे.

दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, जिल्हाधिकारी यांनी कोरोना नियमांचे अटी व शर्ती लागू करून दुकान सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकानदार यांचे पालन करत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी जळगाव महापालिकेचे अतिक्रमण विभागाने उपायुक्त श्याम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेदरम्यान तपासणी मोहीम राबविण्यात आले. या मोहिमेत मॉल, दुकाने, हॉटेल्स व इतर ठिकाणी पाहणी करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क न लावणे, लसीकरण न करणे आदी तपासण्यात आले.

यात बळीरामपेठेतील मनोहर साडीयॉ, श्री.जी. साडीयॉ, ओंकारेश्वर मंदीर समोरली वसंत सुपर शॉप, बाहिणाबाई उद्यानसमोरील नवजीवन प्लस, टॉवर चौकातील बॉम्बे सेल्स, नवीपेठेतील मनोहर शुज सेंटर, राजेश कलेक्शन, बळीराम पेठेतील नितीन फुट वेअर्स, संत कंवरराम क्लॉथ स्टोअर्स आणि आकाश एजन्सी अशा दहा दुकानदारांना एकुण 1 लाख 10 हजार रूपयांची दंडाच्या नोटीसा बजावण्यात आल्या असून 24 तासाच्या आत खुलासा न दिल्यास आकारलेली दंडाची रक्कम वसूलीचा इशारा श्याम गोसावी यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com