गृहसचिवांसह तपासधिकार्‍यांना बजावली नोटीस

राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसेंची पत्रकार परिषदेत माहिती
गृहसचिवांसह तपासधिकार्‍यांना बजावली नोटीस

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दूध संघातील (milk union) तूप व दूध भूकटी चोरी (theft of ghee and milk) प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर (court order) देखील कार्यकारी संचालकांची (Executive Director) तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ (police refrained )केली. पोलिसांनी मंगेश चव्हाण यांच्या तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द (canceling the crime) करुन लिमयेंच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल व्हावा. यासाठी लिमये यांनी औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) याचिका दाखल (Petition filed) केली होती. त्या याचिकेवर सुनावनी होवून न्यायालयाने राज्याचे गृह सचिव, (State Home Secretary,) पोलिस अधिक्षकांसह (Superintendent of Police) संबधित तपास अधिकार्‍यांना (Investigating Officers concerned) नोटीसा (Notice served) अशी माहिती राष्ट्रवादीचे आ. खडसे (NCP's MLA. Eknathrao Khadse) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

गृहसचिवांसह तपासधिकार्‍यांना बजावली नोटीस
एकनाथराव खडसे म्हणतात : सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना आ. खडसे म्हणाले की, खाण्यायोग्य नसलेले दीड ते दोन कोटी रुपयांच्या बी ग्रेड तुपाची चोरी झाल्याची तक्रार देण्यासाठी चेअरमन व कार्यकारी संचालक शहर पोलिस ठाण्यात गेले होेते. यावेळी पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली त्या दिवशी पोलीस ठाण्यात आम्ही आंदोलन देखील केले. गुन्हा दाखल न केल्याच्या विरोधात दूध संघाकडून न्यायालयात याचिका दाखल केली होती.

गृहसचिवांसह तपासधिकार्‍यांना बजावली नोटीस
अन् त्यांच्या संशोधनाच्या अविष्कारावर पारितोषिकांची उमटली मोहर
गृहसचिवांसह तपासधिकार्‍यांना बजावली नोटीस
जळगावच्या महापालिका आयुक्तांच्या कामकाजाचे लेखा परिक्षण व्हावे

त्यावर सुनावनी झाल्यानंतर न्यायलयाने पोलिसांना एमडींच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न करता आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिसांवर राजकीय दबाव आणून त्यांनी तक्रार अर्ज दिला होता. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चोरीच्या गुन्हा नोंदवून तात्काळ संशयितांचा शोध न घेता दुध संघाचे पाच वर्षाचे रेकॉर्ड मागवून त्यात एमडी व चेअरमन यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला.

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बजावली नोटीस

न्यायालयोन आदेश देवून देखील पोलिसांकडून गुन्हा दाखल केला नसल्याने न्यायालयाचे आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दूध संघाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर दि. 14 रोजी सुनावणी होणार आहे. तसेच याच प्रकरणात पोलिसांनी कर्तत्वात कसूर केल्याप्रकरणी खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने गृह सचिव, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, पोलिस निरिक्षक विजयकुमार ठाकूरवाड व उपपोलिस निरिक्षक संदिप परदेशी यांना नोटीस बजावली आहे.

नोटीसवर म्हणणे मांडण्यासाठी 16 पर्यंत मुदत

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह 14 जणांनी बनावट कागदपत्रांद्वारे चुकीचे ठराव करुन त्यांनी मतदार यादीत नावे समाविष्ट केली होती. यावर असोदा येथील खेमचंद महाजन खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सूनावणी होवून संबंधितांना दि. 16 रोजी पर्यंत आपले म्हणणे मांडावे लागणार असल्याचे आ. खडसेंनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com