
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-
छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष आवश्यक करा, परंतू त्यापेक्षाही त्यांचे विचार प्रत्येकाने अंगीकृत करण्याची आज गरज आहे. फक्त घोषणा देवून चालणार नाही, तर सर्वापर्यंत महाराजांचे विचार पोहचविण्यासाठी आज प्रत्यकाने काम केले पाहिजे, शिवाजी महाराज हे गड्ड किल्ल्यावर चालत जायचेे, त्यामुळे आम्ही देखील शिव किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यासाठी, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतच जातो, मुख्यमंत्री किवा इतर मंत्र्याप्रमाणे हेलिकॉप्टरने जात नसल्याची मिश्किल टिका युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मंत्र्यांच्या शिवाजी महाराज बद्दलच्या विचारांबाबत केली.
शहरातील राजपूत मंगल कार्यालयात मिशन ५०० कोटी जलसाठा पाचपाटील टिमतर्फे दि,१८ /२/२०२३ रोजी आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. उज्जवलकुमार चव्हाण यांच्यासह पाच पाटील टीमचे प्रा.तुषार निकम, एकनाथ माळतकर, शेखर निंबाळकर, सविता राजपूत, आरस्ता माळतकर, सुशांत भिलारे, जितेंद्र परदेशी, प्रा.संजय घाटे, प्रा.एम.डी.देशमुख, संदिप राठोड, राजेंद्र पाटील, किरण पाटील, अभिजीत पवार, श्रीकांत पायगव्हाणे आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना युवराज छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या अनेक नित्या होत्या, त्यापैकी जलनीती पुढे नेण्याची काम पाच पाटील टीम करीत आहेत. शिवाजी महाराजांनी त्याकाळात पाण्याचे महत्व जाणले होते. त्यामुळे आजही महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसून येते, रायगडावर आजही महाराजांनी पाण्यासाठी केलेली शिवकालीन उत्तम व्यवस्था दिसून येते. पुढे ते म्हणाले की, मला आज आणि उद्या भरपूर कार्यक्रम आहेत.
शिव किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यासाठी देखील जायचे आहे. राजस्थानसह इतर राज्यांमध्ये आजही तेथील वशंज हे राज-महाराजांसारखे जीवन जगतात. परंतू शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, ते सर्वसामान्याचे राजे होेते, मी महाराजांचे विचार पुढे नेण्यासाठी, त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून, शिव किल्ल्यावर चालतच जातो, मुख्यमंत्री किवा इतर मंत्र्याप्रमाणे हेलिकाप्टरने नव्हे. आम्ही शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आनून चालत आहोत, त्यामुळेच लोक आम्हाला मानतात केवळ महाराजांचा वारसदार म्हणून नव्हे. असे देखील ते सांगण्यास विसरले नाहीत.
पाण्यासाठी लोकसहभागातून चळवळ उभी करा-
आजही महाराष्ट्रातील पाणी इतर राज्यात वाहून जात आहे. पावसाचे पाणी आडविण्यासाठी महाराष्ट्रात आजही प्रभावी उपाय-योजना केलेल्याचे दिसून येत नाही. त्यासाठी शासनाच्या मदतीची किवा पैशांची वाट न पाहता, प्रत्येकाने पाच पाटील टीम साखरे काम केले तर जलसाठ्यासाठी महाराष्ट्रात मोठे काम होवू शकते. पाणी साठा निर्माण झाला तर आपला परिसर समृध्द होईल. महाराजाचा जय जयकार तर कराच, परंतू त्याचे विचार अंगीकृत करुन, महाराजांचे स्वराज्य हे सुराज्य कसे होईल यासाठी लोकसहभागातून चळवळ उभी करण्याची गरज असून याच चळवळीतून महाराजांच्या विचारांची जनजागृती करता येणार असल्याचे यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी सांगीतले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्ये ग्रामस्थ व पाच पाटील टीमचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जलसाठ्यासाठी काम करणार्या प्रत्येक टीमचा महाराजांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सुत्रसंचालन सचिन निकम यांनी केले. तर आभार डॉ.उज्जवलकुमार चव्हाण यांनी मानले.