
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
महापालिकेकडून नो व्हॅक्सीन नो पेट्रोलचे No vaccine, no petrol’ आदेश गुरुवारी काढण्यात आले. मात्र शहरातील एकाही पेट्रोल पंप चालकांनी नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस Corona preventive vaccine dose बद्दल विचारणा न करता त्यांना पेट्रोल दिले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशाचा पहिल्याच दिवशी फज्जा Fajja on the first day उडालेला दिसून आला. तसेच पेट्रोलपंपचालकांसह Petrol pump operators प्रतिष्ठांना मनपाकडून Municipal Corporation कुठलेही आदेश Any order देण्यात आले नसल्याने व्यावसायीकांसह नागरिकांमध्ये संभ्रम Confusion निर्माण झाला आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंध लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी व त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी महापालिकेकडून निर्बंध घातले जता आहे. यात नागरिकांनी कोरोना प्रतिबंध लसीकरणाचे सर्टीफिकेट दाखविल्याशिवाय पेट्रोलसह त्यांना शहरातील प्रतिष्ठानांमधून वस्तू विक्री न करण्याचे आदेश मनपा उपायुक्त शाम गोसावी यांनी गुरुवारी काढले आहेत. त्यानुसार आज सकाळी शहरातील सर्वच पेट्रोलपंपावर जावून पाहणी केली असता, एकाही पेट्रोलपंपासह प्रतिष्ठानांवर ग्राहकांकडून लसीकरणाच्या सर्टीफिकेटची मागणी न करता त्यांना सर्रासपणे पेट्रोलची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पहिल्याच दिवशी मनपाच्या आदेशाचा नागरिकांनी फज्जा उडविल्याचे चित्र शहरात दिसून आले.
मनपाकडून करावी
तपासणीसाठी उपाययोजना
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मनपाने उचलल्या पावलांचे काही नागरिकांनी स्वागत तर काहींनी निषेध व्यक्त केला आहे. यात काही पेट्रोल पंप चालकांनी सर्टिफिकेट तपासणीसाठी मनपाने उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच ज्या नागरिकांनी लस घेतलेली नसेल अशा नागरिकांचे लसीकरणासाठी पेट्रोल पंपावरच मनपाने लसीकरण पथक नियुक्त केल्याने लसीकरणाचा वेग वाढण्यात मदत होईल अशी अपेक्षा पेट्रोल पंप चालकांनी व्यक्त केली.
कुठलीही नोटीस नाही
महापालिका प्रशासनाकडून नो व्हॅक्सीन नो पेट्रोलचे आदेश काढण्यात आले. परंतु त्याबाबत शहरातील कुठल्याही पेट्रोलपंप चालकांसह प्रतिष्ठानांना त्याबाबचे आदेश किंवा सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे ग्राहकांसह व्यापार्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याची मत पेट्रोलपंप चालकांनी व्यक्त केले.
मनपाचे पथक नेमण्याच्या सूचना
पेट्रोल पंप चालकांवर लसीकरणाचे सर्टीफिकेट तपसणी लादणे हे अन्यायकारक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पंपावर मनपाने सर्टीफिकेट तपासणीसाठी पथक नेमावे अशी त्यांनी मागणी केली. तसेच संबधित यंत्रणेने वाहनधारकांना पास उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना मांडली. तसेच कामधंदे बंद असून पेट्रोल पंप चालक पेट्रोल देणार नसतील तर आम्ही जगायचे कसे अशी भावना काही वाहनधारकांनी व्यक्त केली. एक डोस घेतला असून दुसरा डोस घेण्यासाठी निर्धारित वेळ पूर्ण करणे अपेक्षित असल्याने आम्हालाही पेट्रोल देण्यात यावे अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे.