
फेकरी, ता. भुसावळ (वार्ताहर) bhusaval
राज्यात (maharastra) भारनियमनाच्या नुकत्याच वावड्या उठत असून गेल्या 20 ते 25 दिवसांपासून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात भारनियमन (Power load regulation) होत नसल्याचा दावा ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Minister Nitin Raut) यांनी केला आहे. ते शुक्रवारी (jalgaon) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील (Deepnagar Thermal Power Station) विश्रामगृहात ऊर्जामंत्री राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यातील विविध ठिकाणी वीज भारनियमनाबाबत अनेक संभ्रम आहेत. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विचारले असता त्यांनी राज्यात कुठेच गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून नंबर डिलीट झाला कुठेच भारनियमन नाही. भारनियमनाबाबत राज्यात नुकत्याच वावड्या उठवल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीत कुठेच भारनियमन नाही. व यापुढे राज्यात कुठेच भारनियमन होणारही नाही असा विश्वासही यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.
ऊर्जामंत्री येताच विश्रामगृहाची बत्ती गुल- ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे सकाळी दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील पूर्णा विश्रामगृहात ऊर्जा मंत्री येताच विश्राम गृहाची बत्ती गुल झाली होती.ओव्हरलोड मुळे पूर्णा विश्रामगृहाचा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळाली. ऊर्जा मंत्र्यांसमोर वीज पुरवठा खंडित झाल्याने दिपनगर प्रशासनाची उडाली तारांबळ
काँग्रेस-राष्ट्रवादी मधील शाब्दिक वादाच्या प्रश्न विचारताच काढता पाय
यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना सद्यस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक वादावर प्रश्न विचारला असता या प्रश्नाला बगल देत त्यांनी काढता पाय घेतला. याबाबत मला कुठलीही माहिती नसून माहिती घ्यावी लागेल असे उत्तर त्यांनी दिले.