यावलच्या निंबाळकर किल्ल्याची होणार दुरुस्ती

जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक
यावलच्या निंबाळकर किल्ल्याची होणार दुरुस्ती

यावल - अरुण पाटील

येथील प्रसिद्ध अशा यावलच्या निंबाळकर यांच्या किल्ल्याची पडझड झालेली असून त्याची जिल्हाधिकारी (Collector) जळगाव यांनी दखल घेत काल त्यांच्या दालनात बैठक बोलावून या किल्ल्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी अधिकारी स्तरावर चर्चा करण्यात येऊन या ठिकाणी विशेष करून यावल येथील एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान आणि हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक यांना पाचारण करून चर्चा करण्यात आली.

हा साडेतीनशे वर्षांपूर्वीचा जुना आहे त्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे या किल्ल्याच्या भिंतीवर तळे गेलेले असून काही ठिकाणी झाड उगलेली आहेत तर किल्ल्यावर सुद्धा अशीच झाडे असून परिसरात अतिक्रमित नागरिक या किल्ल्यावर प्रातविधीला जातात त्यामुळे किल्ल्याची अवहेलनाच होते यासाठी यावल येथील काही तरुणांनी एकत्रित येऊन या किल्ल्याची मागे साफसफाई केलेली होती त्यातच गेल्या चार वर्षापासून एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर अभय रावते यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी बरेचसे कामगिरी हाती घेतलेली होती त्यातच हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुर्वेकर यांनी त्यात भर टाकली यासंदर्भात शासनाकडे पुरातत्व विभागाकडे त्याचा पाठपुरावा सुद्धा त्यांनी केलेला आहे.

यावल हे गाव महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या नकाशावर श्री व्यास महर्षींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या घटनेमुळे महत्त्वाचे आहे त्याचीच भर म्हणून आणखी निंबाळकरांचा किल्ला हा यावल साठी उद्बोधन करून जातो या किल्ल्याची झालेली पडझड व याकडे कुणाचीही लक्ष नसल्यामुळे डॉक्टर अभय रावते व प्रशांत दुर्वेकर यांनी या ठिकाणी केलेली श्रमदानाची मेहनत याची दखल प्रशासनाने घेतलेली असून जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल साहेब यांनी 4 जून 23 मंगळवार रोजी संध्याकाळी आपल्या दालनात एक बैठक बोलावली त्यात फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलक, यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, तसेच भुमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी यावल नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी कदम साहेब व संबंधित अधिकारी यांनी या बैठकीला हजेरी लावली.

याआधी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी 3 जुलै 23 सोमवार रोजी पहाटे आपल्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन डॉक्टर अभय रावते यांना बोलावून या किल्ल्याची पाहणी केली होती त्यानुसार तहसीलदार मॅडम यांना या किल्ल्याची पाहणी करून या ठिकाणी नेमकी आजची स्थिती काय आहे? असा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात सांगितलेला होता त्यानुसार त्यांनी या मीटिंगमध्ये सर्व माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सादर केले.

त्यात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी यावल येथील किल्ल्याची जी पडझड झालेली आहे भिंतीवर झाडे उगवलेली आहेत बाजूला रहिवाशांचे अतिक्रमण झालेले आहे भिंती सुटलेल्या आहेत तडी पडलेले आहेत या जर कोसळल्या तर त्या ठिकाणी मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी येथील झाड ही केमिकल युक्त फवारणी करून झाडे नष्ट करण्यात यावी या किल्ल्याच्या चौफेर कंपाऊंड करण्यात यावी किल्ला संवर्धनासाठी इस्टिमेट आरगिओलॉजिस्ट डिपार्टमेंट यांच्यामार्फत पंधरा दिवसात अहवाल सादर करून किल्ला दुरुस्तीसाठी काय खर्च लागू शकतो व लवकरात लवकर इस्टिमेट कसा सादर करता येईल असे आदेशही देण्यात आले पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकारी जळगाव अमन मित्तल ही स्वतः या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी येणार आहेत एक या किल्ल्याच्या दुरुस्ती व देखभाल साठी आणि स्वयंसेवी संघटनांचा सहभाग यात असावा म्हणून एक ग्रुप तयार करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमाला डॉक्टर अभय रावते व हिंदू जनजागृती समितीचे जिल्ह्याचे समन्वयक प्रशांत जुर्वेकर ही उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com