नीलगाईची रिक्षाला धडक; एक जागीच ठार

नीलगाईची रिक्षाला धडक; एक जागीच ठार

टिव्ही टॉवरजवळील घटना; जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

भुसावळहून जळगावकडे येणार्‍या अ‍ॅपेरिक्षाला (rickshaw) नीलगाईने धडक (Nilgai hits) दिल्याची घटना सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास टीव्ही टॉवरजवळ घडली. धडक इतकी जोरदार होती की रिक्षा दोन वेळा पलटी (rickshaw overturned twice) झाली. या अपघातात साबीर सत्तार बागवान (वय-40, रा. जाममोहल्ला, भुसावळ) यांचा जागीच मृत्यू (Death on the spot) झाला. तर अन्य चौघे जखमी झाले आहे. जखमींवर (injuries) शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (Government Medical Hospital) उपचार (Treatment) सुरु आहे.

भुसावळ येथील जाम मोहल्ल्यातील साबीर बागवान हे (एमएच19 व्ही 9521) क्रमांकाच्या रिक्षाने जळगावला येत होते. टीव्ही टॉवरजवळ रस्ता ओलांडणार्‍या नीलगाईने रिक्षाला (rickshaw) जोरदार धडक (Strong beating) दिली. या धडकेत रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा दोन वेळा पलटी झाली. या अपघातात रिक्षात चालकाच्या बाजूला बसलेले साबीर सत्तार बागवान यांचा जागीच मृत्यू (Death on the spot) झाला तर त्यांच्या सोबत असलेले इतर चारजण गंभीर जखमी झाले. जखमींना (injuries) तात्काळ नागरिकांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयता(Government Medical Hospital) दाखल केले. त्यांच्यावर याठिकाणी उपचार सुरु आहे.

केळी विक्री करुन करीत होते कुटुंबाचा उदनिर्वाह

मयत साबीर बागवान हे भुसावळ येथे केळी विक्री (Banana sale) करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. जळगावला ते कामानिमित्त येत असतांना त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

रिक्षाचालकासह चौघे जखमी

या अपघातात रिक्षाचालक मोहंमद आलम मोहंमद जान (वय-48, रा. खडकारोड, भुसावळ), नासरिन शेख चाँद बागवान (वय-65, रा. धुळे), साहिल मगबुल बागवान (वय-13, रा.तांबापुरा), बबिता कन्हैय्यालाल बडगुजर (वय-45, रा. पिंपळकोठा) हे चार जखमी(injuries) झाले. जखमींवर उपचार सुरु आहे.

रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

अपघाताची माहिती मिळताच जखमींसह मयत साबीर बागवान यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com