कर्जोद-अहिरवाडी रस्त्यावर नवजात अर्भक सापडले

कर्जोद-अहिरवाडी रस्त्यावर नवजात अर्भक सापडले

रावेर|प्रतिनिधी raver

कर्जोद अहिरवाडी रस्त्यावर स्त्री जातीचे नवजात बाळ काटेरी झुडुपात टाकलेले मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.

सदरील घटना बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास उजेडात आली. (bjp) भाजपचे युवा कार्यकर्ते संदीप सावळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पि.के.महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, अरुण शिंदे यांनी या बाळाला रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.बाळाची प्रकृती चांगली आहे,७-८ दिवसांपूर्वी बाळ जन्मले असल्याचा अंदाज असून, जन्मदाती या बाळाला काटेरी झुडुपात सोडून गेले असावेत, अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com