प्रतिक्रांती घडविण्याचे षड्यंत्र हाणून पाडण्याची गरज -- भिमराव तायडे

प्रतिक्रांती घडविण्याचे षड्यंत्र हाणून पाडण्याची गरज -- भिमराव तायडे

मुक्ताईनगर Muktainagar (वार्ताहर) --

" भारतीय राज्यघटना Indian Constitution जगातील सर्वात मोठी व लिखित असून सर्वांना स्वातंत्र्य, समता ,न्याय, बंधुता बहाल करणारी आदर्श अशी राज्यघटना आहे.ती तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी Dr. Babasaheb Ambedkar अथक परिश्रम घेतले. या देशातील शेवटच्या घटकापर्यंत हक्क अधिकार पोहोचविले. परंतु देशात आज राज्यघटना बदलविण्याचे , प्रतिक्रांती Counter-revolution घडविण्याचे षडयंत्र Conspiracy सुरु आहे.ती प्रतिक्रांती हाणून पाडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संविधान अभ्यासक तथा भारतीय बौद्ध महासभेचे माजी राज्य संघटक भिमराव तायडे Constitutionalist Bhimrao Tayde यांनी मुक्ताईनगर येथे केले.

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखामुक्ताईनगर तसेच परिवर्तन कला मंच मुक्ताईनगरतर्फे प्रवर्तन चौक जे.डी.सी.सी.बँक समोर संविधान गौरव दिन व महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन आयोजित समारंभात श्री.तायडे हे बोलत होते.याप्रसंगी धम्मदेसना पूजनीय भदंत दिपंकर थेरो यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष शरद बोदडे हे होते.


कार्यक्रमप्रसंगी पूजनीय भन्ते दीपंकर थेरो चैत्यभूमी मुंबई यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली तर प्रमुख अतिथी म्हणून भा. बौ. महासभेचे नाशिक विभागीय सचिव के.वाय. सुरवाडे , महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी व गायक प्रतापसिंग बोदडे तसेच दत्ता शिंदे , भारतीय बौद्ध महासभेचे जळगाव जिल्हा पालकमंत्री डॉ.अनिल वानखेडे , जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव , जिल्हा कोषाध्यक्ष बी.एस.पवार , समता सैनिक दल लेफ्टनंट कर्नल युवराज नरवाडे , संस्कार विभाग सचिव भीमराव पवार , केंद्रीय शिक्षक प्रा. संजीव साळवे , दलित मित्र पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते वल्लभ चौधरी , संघटक सुनील आढागळे , विश्वंभर अडकमोल एन.जी. शेजोळे तसेच परिवर्तन कला मंचचे तालुका अध्यक्ष एस.टी. हिरोळे यांची उपस्थिती होते.
सुरुवातीस प्रवर्तन चौकातील महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी समता सैनिक दलाचे लेफ्टनन कर्नल व जवानांनी मानवंदना दिली.


प्रबोधनाच्या कार्यक्रमानंतर परिवर्तन कला मंचतर्फे गीत गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व पदाधिकारी व संविधान प्रेमी उपासक-उपासिका यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली.


प्रास्ताविक केंद्रीय शिक्षक प्रा.संजीव साळवे यांनी केले.याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील बौद्ध समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यासोबतच वर्षावास प्रवचन मालीकेत प्रवचनकार म्हणून भूमिका निभावलेल्या व्यक्तींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच ज्या गावांनी वर्षावास प्रवचन मालिकेत सहभाग नोंदवला त्या गावकऱ्यांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता ब्रह्मानंद तायडे यांचाही भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मुक्ताईनगरतर्फे सन्मान चिन्ह प्रमाणपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले भिमराव तायडे यांनी तब्बल एक ते सव्वा तास संविधानाच्या निर्मितीबाबत तसेच बाबासाहेब यांनी अभ्यासपूर्ण व खूप कष्टाने तयार केलेल्या सविधाना बाबत मार्गदर्शन केले ते म्हणाले की, दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या संबंध संविधानाची आहे कारण काँग्रेसने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस हिटलरच्या बाजूने जाण्याचे ठरविले होते.परंतु बाबासाहेबांनी या निर्णयाच्या विरोधात आपले मत मांडून हिटलर हा हुकूमशहा असून हिटलरच्या बाजूने लढल्यास भारत देशाचे किती मोठे नुकसान होणार ? त्याचे परिणाम काय होणार ? या संदर्भात अतिशय दूरदृष्टी असलेले विचार मांडले.

त्यामुळे हिटलरच्या विरोधात ब्रिटिशांकडून भारत लढला ब्रिटिशांंना भारत देश सोडण्याचे वचन पाळावे लागले.त्यानंतर संविधानाची निर्मिती झाली.अशाप्रकारे संविधानाचा संबंध दुसर्‍या जागतिक महायुद्धाशी असल्याचे श्री.तायडे यांनी सांगितले.


शेवटी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष शरद बोदडे यांनी अध्यक्षीय भाषण केले त्यात सर्वांनी संविधान समजून घेणे महत्त्वाचे असून संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकजूट होणे गरजेचे असल्याचे आवाहन केले.


याप्रसंगी दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक प्रतापसिंग बोदडे मुंबई येथील ख्यातनाम कवी गायक दत्ता शिंदे कुणाल बोदडे यांच्यासह अकोला बुलढाणा जळगाव जिल्ह्यातील रागिनी बोदडे सुनील केदारे अंकुश घुसळे एमके तायडे रोहिणी आढागळे लताबाई बोदडे सुरज शिरसाट यांनी अतिशय सुमधुर बुद्ध फुले भीम गीतांचा गायनाचा सुमधुर कार्यक्रम सादर केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे पुरुषोत्तम भारसाकळे नामदेव इंगळे,डॉ दिलीप पानपाटील, प्रवीण सदार , प्रा. थोरात , अमोल वाघ, जितेंद्र मेढे , प्रा. सुशील बोदडे , विलास तायडे , सुरेश भालेराव , श्रीरंग गुरचळ , प्रमोद इंगळे तसेच परिवर्तन कला मंचचे उपाध्यक्ष शंकर इंगळे ,सचिव कुणाल बोदडे , किरण मेघे ,दिलीप पोहेकर , शाहीर आर. आर.धुरंधर यांनी तसेच मुक्ताईनगर येथील सुधाकर बोदडे पंचशील टेलर , अनिल बोदडे ,रवींद्र बोदडे यांनी परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन तालुका सचिव चंद्रमणी इंगळे सुनील आढागळे यांनी केले.तर आभार भारतीय बौद्ध महासभेचे तालुका कोषाध्यक्ष आर.वाय. सोनवणे यांनी मानले.

Related Stories

No stories found.