
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
देश प्रगतीशील होण्यामागे महिलांचा देखील मोठा सहभाग आहे. परंतु हे असताना देखील एकीकडे महिलांचे होत असलेले (exploitation of women,)शोषण, आज समाजात अनेक तरुणी व स्त्रिया लव जिहादला (Love Jihad) बळी पडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक घरातील पालकांसह (parents) महिलांनी मुलींमध्ये (girls by women) जनजागृती (public awareness) करण्याची गरज आहे, असे मत प्रमुख वक्त्या योगिता साळवी यांनी व्यक्त केले.
रविवारी सभाजी राजे नाट्यगृहात विश्व हिंदू परिषदतर्फे मातृशक्तीचा जागर कार्यक्रम घेण्यात आला.त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.शिल्पा बेंडाळे होत्या.या कार्यक्रमाला संगीता पाटील, कुंदाताई अंदुरे, डॉ. सीमा पाटील, पल्लवी मयूर, हरीशभाई मुंदडा, संध्या देशमुख, डॉ. मनीष चौधरी, वैशाली देशमुख, कांचन साने आदी उपस्थित होते. योगिता साळवी पुढे म्हणाल्या की, शिक्षण घेत असताना मुलांचे पडते पाऊल यावर पालकांनी लक्ष देण्याची वेळ आलेली आहे.
पालकांनी मुलांसोबत किमान एक वेळ जेवण करणे आवश्यक आहे. आज काल लिव्ह इन रिलेशनशिप हा वाढता प्रकार बघता मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. लव जिहाद म्हणजे काय हे दोन धर्मामध्येे तेढ वाढवणारे एक नाव नसून असंख्य पीडित मुली याचे शिकार झालेले आहेत. याचीच एक पीडितेची आपबिती पीडित मुलगी समोर न येता पत्राद्वारे मांडली आहे.
लव जिहाद कसा सुरू होतो. कश्या प्रकारे महिला यात अडकवल्या जातात व नंतर त्यांचे काय केले जाते असे सर्व प्रमुख मुद्दे यावर अतिशय प्रखडपणे त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेवती गर्गे यांनी केले.