मुख्यमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

पन्नास खोके, एकदम ओक्के लिहिलेले टी-शर्ट घालून केली घोषणाबाजी
मुख्यमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) सभेच्या स्थळी पाळधी येथे जात असताना आकाशवाणी चौकात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांकडून (office bearers of NCP) पन्नास खोके, एकदम ओक्के असे लिहिलेले टी-शर्ट घालून घोषणाबाजी (Sloganism) करीत त्यांनी आंदोलन (movement) करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी आंदोलनापूर्वीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. मंगळवार,दि.20 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास विशेष विमानाने त्यांचे विमानतळावर आगमन झाले. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आली होती. आंदोलन करण्याआधी चौकात असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, रिंकू चौधरी, सुनील माळी यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आंदोलकांना घेतले पोलिसांनी ताब्यात

आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांना धरपकड करीत ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com