अमळनेर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय

अमळनेर तालुक्यातील  13 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय

अमळनेर Amalner प्रतिनिधी 

  अमळनेर तालुक्यात एकूण 24 ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Gram Panchayat Elections) होत्या त्यापैकी चार  बिनविरोध झाल्या होत्या  आज निकाल लागलेल्या 20 ग्रामपंचायत  निकाल (result) लागले आहेत 24 ग्रामपंचायत पैकी 13 ग्रामपंचायतीवरती राष्ट्रवादी काँग्रेस (NCP wins) लोकनियुक्त सरपंच निवडून आलेले आहेत

186 ग्रा प सदस्य पैकी  110 ग्रा प सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले आहेत  महाविकास आघाडीचे एकूण 16 लोकनियुक्त सरपंच निवडून आलेले आहेत असा दावा  राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी केला  असून आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वावर ग्रामीण जनतेने विश्वास दाखवल्याचे त्यांनी म्हटलेले आहे 

भाजपाचे माजी  विधानपरीषद आमदार स्मीता वाघ यांनी सागितले की अमळनेर  तालुक्यातील 24 पैकी  16 जागांवरती भाजपाचे  लोकनियुक्त सरपंच निवडून येवून ग्रामीण जनतेने  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणिस  ग्रामविकास मंत्री गिरीष भाऊ महाजन भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब याच्या वरती विश्वास दाखवून  हा विजय मिळवला असून महाराष्ट्रातील बहुतेक ग्रामपंचायतीवरती  शिदे गटाचे  मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे   व भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडवणी यानी झेंडा फडकविला आहे असे त्यांनी म्हटले आहे

विजयी लोकनियुक्त सरपंच -

1)कन्हेरे -  चंद्रकांत अरुण नेरकर2) आमोदे - रजनी सुरेश पाटील 3) इंद्रापिंप्री - रवींद्र भिला भिल 4) मारवड - आशा सुभाष भिल 5) मुंगसे - शोभा निलेश कोळी 6) रुंधाटी - मालुबाई धनराज पवार 7) कामतवाडी  - भगवान पितांबर पाटील8) नगाव खु - सरला चंद्रकांत जगदाळे 9) नगाव बु - सारिताबाई पद्माकर गोसावी 10) कोंढावळ - भूषण गुलाबराव पाटील 11) जानवे - सरला प्रकाश पाटील12) गंगापुरी खापरखेडा - सुदर्शन वसंत पाटील 

13) भिलाली - महेंद्रसिंग भटेसिंग राजपूत 14) वावडे - कोकिळाबाई प्रल्हाद पाटील 15) डांगर बु - प्रकाश रंगराव वाघ 16) जैतपिर - संगीता महेंद्र पाटील17) सुंदरपट्टी - अर्चना प्रेमराज पाटील 18) तासखेडा - कल्पनाबाई सुनील पाटील 19) हेडावे - मनीषा भास्कर पाटील 20) खापरखेडा प्र डा - सुनील मंसाराम पाटील असे लोकनियुक्त सरपंच विजयी झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com