जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेत फूट?

मुक्ताईनगर मतदारसंघातील अवैधधंद्यावरुन आरोप प्रत्यारोप
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेत फूट?

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मुक्ताईनगर, वरणगाव, बोदवडसह विविध ठिकाणी सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध धंदे (Illegal trades) तसेच बोदवड नगरपंचायत (Bodwad Nagar Panchayat) निवडणुकीत (election) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना धक्काबुक्की (Pushback to NCP office bearers) पैसे वाटपाच्या आरोपावरुन राज्याच्या सत्तेत सहभागी शिवसेना (Shiv Sena) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) वाद (Argument) चांगलाच पेटला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने काल जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचे मुक्ताईनगरात वरणगावात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यावर शिवसेनाही आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीने केलेले आरोप बिनबुडाचे व खोटे असल्याचे प्रत्युत्तर शिवेसनेने दिले आहे. तसेच यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

21 डिसेंबर रोजी बोदवड शहरातील वार्ड क्रमांक 14 मध्ये पोटनिवडणूकीसाठी मतदान घेतले जात होते. त्यावेळी एका मतदान केंद्रात परवानगी नसतांना एका पक्षाच्या चिन्ह असलेले वाहन आत आले. त्यावेळी मतदान केंद्र परिसरात वाहने आणण्यास मनाई असल्याचे पोलीसांच्या लक्षात आणून दिले. याचा राग आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्यासह मतदान केंद्रात येवून मोठमोठ्याने आरडाओरड करून शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांना एकेरी भाषेचा अपमान केला. यावेळी गोंधळ निर्माण झाल्यावर पोलीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील आणि समाधान महाजन यांना मतदान केंद्राच्या बाहेर जाण्यास सांगितले. हा प्रकार घडल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी बुधवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यात मुक्ताईनगर, वरणगावात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचे अवैधधंदे असून त्यावर कारवाईची मागणी केली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी

शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी केली. तसेच मागण्यांचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, तालुकाप्रमुख छोटू भोई, शिवसेना जिल्हासंघटक विलास मुळे, अल्पसंख्यांक विभागाचे अफसर खान, सय्यद जाफर अली, हिप्पी सेट, तुषार बोरसे, बोडवडचे जिल्हा उपसंघटक शेख अस्लम, अ‍ॅड. कैलास लोखंडे, ड. मनोहर खैरनार, प्रा. उत्तम सुरवाडे, राजेंद्र नेहेते, मनोज भोई, युनुस खान, अमोल व्यवहारे, संतोष माळी, शेख. सईद शेख भिस्ती, विशाल पाटील, जफरअली हिप्पी शेट, सैय्यद मुजाहीद, मुद्दस्सर खान, निलेश महाजन, सुनिल पाटील, राहूल शर्मा, अ‍ॅड. चंद्रकांत शर्मा, विजय गायकवाड आदी उपस्थित होते. घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेनेत फूट?

जिल्ह्यात बोदवड नगरपंचायतीची निवडणूक पार पडली. राज्यात जरी महाविकास आघाडीची सत्ता असली तरी, बोदवड नगर पंचायत निवडणुकीत सत्तेत सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. तर दुसरीकडे अवैधधंदे व बोदवड नगर पंचायतीतील निवडणुकीतील वादावरुन राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये वाद चांगलाच पेटला आहे. त्यामुळे दोघा मित्रपक्षांमध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

..तर शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

राष्ट्रवादीच्या आरोपानंतर शिवसेनाही आक्रमक झाली आहे. गुरुवारी शिवसेनेतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळण्यात आलेले आहेत. शिवसेनेने नेहमी अवैध धंद्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. शहरात कोणाच्या नावाने अवैध धंदे सुरू आहे हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे शिवसेने बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असून त्यांनी केलेले आरोपी हे बिनबुडाचे आहे. त्यामुळे असले प्रकार न थांबल्यास शिवसेनेला तीव्र आंदोलन करेन असा इशाराही यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.