जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी दहा जागांवर ठाम

राष्ट्रवादीच्या बैठकीत रणनीतीवर चर्चा
जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी दहा जागांवर ठाम
jdcc bank jalgaon

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (District Bank Election) सर्व पक्षीय पॅनल (All sided panel) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीनेे (NCP) दहा जागा (10 seats) मिळाव्यात यासाठी आग्रह (Insistence) धरला आहे. दरम्यान, शुक्रवारी गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक ( Meeting) घेण्यात आली. याबैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे, माजी आमदार दिलीप वाघ, कैलास पाटील, अरुण पाटील, इंदिरा पाटील, संजय पवार, वाल्मीक पाटील, संतोष चौधरी, नाना देशमुख, तिलोत्तमा पाटील उपस्थित होते. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे 13 जागा होत्या.

त्यामुळे आता सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले तर त्यात 10 जागा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह आहे. कोणत्या जागांसाठी आग्रह धरायचा आणि कोणत्या सोडायचा याबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेत भाजपसोबत जायला होकार दिला असला तरी या पॅनलमध्ये राष्ट्रवादी जागांबाबत तडजोड करणार नाही अशीच भूमिका घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

जिल्हा बँकेसाठी होणार्या निवडणुकीसाठी जर राष्ट्रवादी काँग्रेसला समाधानकारक जागा मिळत असतील तर सर्वपक्षीय पॅनलमधून निवडणूक लढा, अन्यथा महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपविरोधात लढा अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्या आहेत. त्यानुसार बैठकीत चचा झाली असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.