
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj), महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्व व भारतीय स्वातंत्र्य संग्रामात (Indian freedom struggle) योगदान देणारे सर्वच राष्ट्रपुरुष (nation man) समस्त भारतीयांसाठी वंदनीय आहेत. राष्ट्रपुरुषांविषयी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (BJP leader Chandrakant Patil) यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या (incoherent statements) निषेधार्थ (prohibition) शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्यावतीने (Nationalist Congress Metropolitan) आंदोलन करीत निषेध नोंदविला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह राष्ट्रपुरुषांविषयी भाजपच्या श्रीपाद छिंदम, तेजस्वी सुर्या, जय भगवान गोयल मंगल, सुधांशु त्रिवेदी, प्रभात लोढा, केंद्रयी मंत्री रावसाहेब दानवे, आ.प्रसाद लाड यांच्यापासून ते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत भाजपाचे नेते सातत्याने राष्ट्रपुरुषांविषयी अपमानास्पद, चुकीचे आणि बेताल वक्तव्य करत राष्ट्रपुरुषांची बदनामी करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. राज्यपाल हे पद घटनात्मक दृष्टीने अत्यंत आदराचे असतांना राज्यपाल कोश्यारी यांनी भाजप नेत्यांचा कित्ता गिरवत राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून या पदाची गरिमा पूर्ण धुळीला मिळवली आहे. हे सर्व ठरवून केल्याचे दिसते आहे या मागे फार मोठे सांस्कृतिक व वैचारिक इतिहास पलटण्याचे राजकारण सुरु आहे, असा आरोपा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांनी केला आहे.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आज रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्यावतीने राष्ट्रपुरुषांच्या सन्मानार्थ बाबासाहेब हम शरमिंदा है मनुवादी अभिभी जिंदा है, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, महात्मा फुले यांचा विजय असो, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचे नेते मत मागताना महापुरुषांचा नावावर मतांची भीक मागतात व निवडणूक झाल्यानंतर महापुरुषांचा अवमान करतात व चुकीचे वक्तव्य करतात, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच चंद्रकांत पाटीलल यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून तीव्र निषेध करण्यात आला. यापुढेही भाजप नेत्यांनी राष्ट्रपुरुषांविषयी असे अवमानकारक वतव्य केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाजप नेत्यांच्या घरासमोर ढोल वाजवून व या नेत्यांच्या तोंडाला काळे फासुन निषेध केला जाईल.
कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रपुरुषांची बदनामी सहन केली जाणार नाही, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरच्यावतीने देण्यात आला आहे.
या निषेध आंदोलनात अशोक लाडवंजारी, एजाजभाई मलिक, रिकू चौधरी, योगेश देसले, अशोक पाटील, मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, वाय.एस.महाजन, ईब्राहिम तडवी, अशोक सोनवणे, रमेश बारे, राजू मोरे, लिलाधर तायडे, किरण राजपूत, भगवान सोनवणे, डॉ. रिजवान खाटीक, सुनिल माळी, सुशिल शिंदे, दिलीप माहेश्वरी, रहीम तडवी, हितेश जावळे, खलिल शेख, रफीक पटेल, दीपिका भाबरे, सुहास चौधरी, सीमा रॉय, अमजेत खाटीक, राहुल टोके, विशाल देशमुख, अनिरुद्ध जाधव, शांताराम अहिरे, इब्राहिम शेख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.