राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे म्हणतात... रात्री चोरासारखा घेतला पदभार

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ
जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ

जळगाव - jalgaon

जळगाव जिल्हा दुध संघाच्या (Jalgaon District Milk Union) प्रशासक मंडळातील (Board of Directors) काही सदस्यांनी (some members) शुक्रवारी रात्री चोरासारखा पदभार (Took charge like a thief) घेतला आहे. रात्रीच्या वेळी कार्यकारी संचालकांना धमकावून पदभार घेण्यामागे या सदस्यांचा हेतू काय? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे (NCP leader MLA Eknathrao Khadse) यांनी माध्यमांशी बोलतांना केला आहे.

एकनाथराव खडसे
एकनाथराव खडसे

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या विषयावरून जिल्ह्यात पुन्हा एकदा खडसेंविरूध्द महाजन असा सामना रंगत आहे. दुध संघावर प्रशासक मंडळाच्या नियुक्तीचे आदेश होताच दुसर्‍या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दि. २९ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास प्रशासक मंडळातील काहि सदस्यांनी दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्याकडून पदभार घेतला.

दुसर्‍या दिवशी शनिवारी पुन्हा मुख्य प्रशासक आमदार मंगेश चव्हाण यांनी एमडींकडून पदभार घेतला. या सर्व विषयांसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आ. खडसे यांनी सांगितले की, मुळात पदभार घेण्याचा अधिकार हा मुख्य प्रशासकालाच आहे आणि तोही चेअरमनकडून घेणे अपेक्षित आहे.

मात्र प्रशासक मंडळातील काही सदस्यांनी रात्रीच्या सुमारास दुध संघाचे एमडींना धमकावून चोरासारखा पदभार घेतला. या सदस्यांना दुध संघाच्या प्रगतीशी काहिही देणेघेणे नाही. त्यांचे लक्ष ङ्गक्त दुध संघात आपल्याला खायला काय मिळेल? याकडेच असल्याचा आरोप केला. दुध संघातील लोण्यावर यांचा डोळा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com