
जळगाव - jalgaon
राष्ट्रवादीचे अध्यक्ष ते अनेक दिग्गज नेते येऊनही जळगाव जिल्ह्यासारख्या एखाद्या जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढत नाही...काय करणार? अशा शब्दात खा. सुप्रिया सुळे यांनी पक्ष संघटनेविषयी आपली हतबलता चक्क पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान संघटनात्मक आढाव्यापेक्षा महागाई या विषयाला अनुसरून दौरे सुरू असल्याचे खा. सुळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा खा. सुप्रिया सुळे आज जिल्हा दौर्यावर होत्या. या दौर्यात त्यांच्या नेतृत्वाखाली महागाई विरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आयोजीत पत्रकार परिषदेत खा. सुळे यांनी संवाद साधला. खा. सुप्रिया सुळे यांना संघटनात्मक विषयावर प्रश्न उपस्थित केले असता पक्ष संघटनेचा आढावा प्रांताध्यक्ष ना. जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. याबाबत तेच काय तो निर्णय घेतील असे सांगून वेळ मारून नेली.
आठ वर्ष पुर्ण झाल्याने मोदींकडून महागाईचे गिफ्ट
केंद्रातील मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याबदल्यात मोदी सरकारने महागाईचे गिफ्ट देशातील जनतेला दिले असल्याची टिका खा. सुप्रिया सुळे यांनी केली. इंधन दरवाढीच्या विषयात राज्य सरकारचे कर मुळात केंद्रापेक्षा कमी असल्याचा खुलासा त्यांनी केला. केंद्र सरकार सेसच्या माध्यमातून करवसूली करून जनतेला सुविधा देत नाहीये. इतर कुठल्याही प्रश्नांपेक्षा महागाई हेच सध्या आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात आम्ही संसदेत सरकारसोबत चर्चेची मागणी केली. मात्र सरकार अद्यापपर्यंत याविषयावर चर्चा करायला तयार नसल्याचे त्या म्हणाल्या.
महिलांचा अपमान सहन करणार नाही
पक्ष कुठलाही असु द्या कुठल्याही महिलेचा अपमान सहन केला जाणार नाही. महिलेविषयी आक्षेपार्ह भाषा कुणी वापरत असेल तर ते योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीच्या महिला त्यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. कुठलाही गोंधळ त्यांनी केला नसल्याचे सांगत त्यांची पाठराखण केली.
.. तर मी पुढाकार घ्यायला तयार
राज्यात सध्याच्या काळात राजकारणाची पातळी अत्यंत खालावली आहे. दोन्ही बाजूकडुन आरोपाला प्रत्यारोप होत आहेत. महिलांविषयी आक्षेपार्ह भाष्य होत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे.हे थांबविण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेऊन चर्चा करायला तयार असल्याचे खा. सुळे यांनी सांगितले.
फडणवीस यांच्या इशार्याला मी घाबरले
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र ङ्गडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा मुंबई येथील सभेत दिला आहे. या प्रश्नावर खा. सुळे यांनी ङ्गडणवीसांच्या इशार्याला मी घाबरले अशा शब्दात टोलविले.