
चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी -
शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या जय गजानन हॉटेल समोर, हॉटेल खाली करण्याच्या कारणावरुन चाळीसगाव न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शाम छगनराव देशमुख यांना महिलासह पुरुषांनी जबर मारहाण केली. तसेच एका महिलेने त्यांच्या हाताला चावा घेतला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून सध्या ते धुळे येथे उपचार घेत आहे. हि घटना दि,२६ रोजी घडली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव पोलीस स्टेशनला शाम छगनराव देशमुख (५६) धंदा- हटेल रा. वाल्मिकनगर चाळीसगाव. यांनी दिलेल्या जाबबनूसार, दि. २६/०५/२०२३ रोजी रात्री ०९ वा. ते १० वाजेच्या सुमारास शाम देशमुख हे हॉटेल जय गजानन नास्ता सेंटर येथे असतांना. त्याठिकाणी योगिता मिस्तरी, अनिता मिस्तरी, सौरभ परदेशी, मनोज परदेशी, निलुबाई परदेशी, बाळु परदेशी सर्व रा. भडगाव रोड गायत्री कम्पलेक्सच्या जवळ चाळीसगाव जि. जळगाव, अशांनी येवुन सांगितले की ‘ तु हटेल खाली कर, नाही तर तुला आम्ही मारुन टाकू’ अशी धमकी दिली. तर सौरभ परदेशी यांनी त्याचे हातातील काहीतरी तिक्ष्ण हत्याराने शाम देशमुख यांच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत करत, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
योगिता मिस्तरी, अनिता मिस्तरी, यांनी लाकडी दांडक्याने डाव्या बाजुला जबड्याला पाठीवर, कमरेवर डाव्या पायाचे गुडघ्याखाली लाकडी दांडक्यानी मारहाण केली व निलुबाई परदेशी हिने शाम देशमुख यांच्या उजव्या हाताचे मनगटाजवळ चावुन घेतले आहे. तसेच मनोज परदेशी, बाळु परदेशी यांनी वाईट साईट शिविगाळ करुन हाताबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. डोक्यातुन जास्त रक्तस्त्राव होवु लागल्यामुळे तेथे उपस्थित लोकांनी भांडण सोडवा सोडव केली. व शाम देशमुख यांना तात्काळ चाळीसगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले ग्रामीण रुग्णालय येथे औषधोपचाराकामी दाखल केले.
शाम देशमुख यांना जास्त त्रास होवु लागल्यामुळे पुढील उपचारासाठी धुळे हिरे मेडीकल कलेज येथे दाखल केले. तेथुन अधिक उपचारासाठी साई रुग्णालय धुळे येथे दाखल करण्यात आले असून सध्या ते उपचार घेत आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला शाम देशमुख यांच्या फिर्यादीवरुन योगिता मिस्तरी, अनिता मिस्तरी, सौरभ परदेशी, मनोज परदेशी, निलुबाई परदेशी, बाळु परदेशी यांचेविरुध्द भादवी कलम ३०७, १४३,१४४,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०४,५०६,१३५ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.