नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पितृपक्ष संपल्यानंतर ओढ लागते ती नवरात्रोत्सवाची (Navratri festival) हा सण देशभभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. नवरात्रोत्सव उद्यावर येवून ठेपला असून नागरिकांकडून त्याची जय्यत तयारी (Proper preparation) करण्यात आली आहे. तसेच घरोघरी घटाची स्थापना करुन व सार्वजनिक मंडळात दुर्गा मातेची स्थापना (Establishment of Mother Durga) करुन नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्याच्या पुर्वसंध्येला बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले.

नवरात्रोत्सव म्हटला की गरबा, दांडियाची सर्वांना ओढ लागलेली असते. तरुणाईसह सर्वच जण नवरात्रोत्सवाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात, तर अनेक सार्वजनिक मंडळांकडून गरबारास व दांडीयाचे आयोजन केले जात असते. नवरात्रोत्सव अवघ्या एका दिवसावर येवून ठेपला असून घरोघरी घट स्थापनेची तयारी केली जात आहे. घटसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली असून नवरात्रोत्सवाच्या पुर्वसंध्येला बाजारपेठ गजबजून गेली आहे.

नियमावली जाहीर केल्याने भाविकांचा हिरमोड

नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार असल्याने सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. परंतु गणेशोत्सव ज्या पद्धतीने साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यापचप्रमाणे यंदा नवरात्रोत्सव देखील साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यासाठी नियमाली देखील जाहीर केली असल्याने भाविकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे.

बाजारपेठेत प्रचंड गर्दी

नवरात्रोत्सावात घटासाठी लागणारे घट, विड्याची पाने, हार-फूलांसह, टोपली यासह पुजेच्या वस्तू विक्रेत्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर दुकाने थाटली होती. दुपारनंतर बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाल्याने सायंकाळपर्यंत ही गर्दी कायम होती.

मंदिरे होणार खुली

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीडवर्षापासून राज्यभरातील धार्मीक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उद्यापासून राज्यभरातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील मंदिरांमध्ये साफसफाईसह रंगरंगोटीचे काम सुरु होते. दरम्यान रात्री मंदिराची आकर्षक सजावट केल्यानंतर उद्यापासून हे मंदिरे भाविकांसाठी खुली होणार आहे. तसेच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार नाही याची जबाबदारी संबंधित मंदिर प्रशासनाची असल्याने त्यानुसार त्यांना नियोजन करावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.