Breaking # राष्ट्रवादी प्रवेश भोवला; भुसावळचे दहा नगरसेवक अपात्र

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा दणका
 Breaking # राष्ट्रवादी प्रवेश भोवला; भुसावळचे दहा नगरसेवक अपात्र

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

भाजप सोडून (Left BJP) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (joined NCP) प्रवेश केला म्हणून पक्षांतर बंदी कायद्यानुसार (According to the Prohibition of Defection Act) भुसावळचे दहा नगरसेवक (Ten corporators of Bhusawal) 18 डिसेंबर 2021 पासून ते नगरपरिषदेच्या पुढील एक कार्यकाळासाठी अपात्र (disqualified) ठरविण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) यांनी ही कारवाई (action) केल्याने भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील त्यांच्या काही समर्थकांनीदेखील भाजपला सोडचिठ्ठी दिली. दि. 18 डिसेंबर 2021 रोजी भुसावळ येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा झाला होता. यावेळी दहा नगरसेवकांनी भाजप सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले होते.

त्यामुळे पुष्पाबाई रमेशलाल बत्रा यांनी या दहा नगरसेवकांना अपात्र करावे म्हणून, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायासनासमोर सुनावण्या झाल्या.

सुनावणी दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी दोन्ही कडील बाजू ऐकूण घेतल्या त्यानंतर सोमवारी भुसावळच्या या दहा नगरसेवकांना दि. 18 डिसेंबर 2021 ते नगरपरिषदेच्या पुढील एक कार्यकाळापर्यंत अपात्र ठरविण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदारातर्फे अ‍ॅड. राजेंद्र टी. राय तर नगरसेवकांतर्फे अ‍ॅड. महेश भोकरीकर, अ‍ॅड. हरिश पाटील यांनी काम पाहीले.

असे आहेत अपात्र झालेले दहा नगरसेवक रमण देविदास भोळे, अमोल मनोहर इंगळे, लक्ष्मी रमेश मकासरे, सविता रमेश मकासरे, प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे, मेघा देवेंद्र वाणी, अ‍ॅड. बोधराज दगडू चौधरी, शोभा अरुण नेमाडे, किरण भागवत कोलते, शैलजा पुरुषोत्तम नारखेडे हे दहा नगरसेवक अपात्र ठरविण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com