नशिराबादला ‘युवा मजल’मॅरेथॉन स्पर्धा

ग्रामीण भागात पहिल्यांदाच आयोजन, पंडितजी चौबे सेवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
नशिराबादला ‘युवा मजल’मॅरेथॉन स्पर्धा
USER

नशिराबाद, ता.जळगाव । वार्ताहर nashirabad

पंडितजी चौबे सेवा प्रतिष्ठान तर्फे नशिराबाद येथे प्रथमच युवा मॅरेथॉन (Marathon) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नशिराबादसह परिसरातील ग्रामीण भागातील युवकांसाठी (Swami Vivekananda) स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून येत्या 12 जानेवारी 2022 रोजी ‘युवा मजल’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल नशिराबाद (New English School Nasirabad) पटांगणावरून सुरू होऊन पाच किलोमीटर अंतरापर्यंत आहे.

नशिराबाद, भादली, कडगाव, जळगाव खुर्द, सुनसगाव, तरसोद, बेळी या भागातील 15 वर्षावरील तरुणांसाठी आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये फी असून सहभागी स्पर्धकांना मोफत टीशर्ट व स्पर्धा पूर्ण करणार्‍या प्रत्येक धावपटूस प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस 3 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 2 हजार रुपये व तृतीय बक्षीस 1 हजार रुपये दिले जाणार आहे.

स्पर्धकांसाठी नाव नोंदणीची अंतिम मुदत दि.25 डिसेंबर 2021 असून या स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरु आहे. नाव नोंदणीसाठी श्रवण कॉम्प्युटर्स (नशिराबाद), अनिल चौधरी सर (नशिराबाद) डि.के.धनगरसर (भादली), अनिल नारखेडेसर (जळगाव खुर्द), योगेश कोळी सर (कडगाव), संदीप महाजन सर (सुनसगाव), विकी थोरात (तरसोद), युवराज नारखेडे (बेळी) यांचेकडे सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com