काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे नरेंद्र भोई यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर
SAM.D.Photography

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे नरेंद्र भोई यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल (Kashinath Palod Public School) चे क्रीडाशिक्षक (Sports teacher) नरेंद्र भोई (Narendra Bhoi) यांना जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचा (District Federation of Physical Education and Sports Teachers) जिल्हास्तरीय (District Level) आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार (Ideal Sports Teacher Award) जाहीर झाला आहे.

क्रीडाशिक्षक नरेंद्र भोई यांनी क्रीडा क्षेत्रात अनेक खेळाडू घडविले असून त्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवलेले आहे. ते राज्य व राष्ट्रीय मल्लखांब पंच परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्याच बरोबर राष्ट्रीय एरियल स्पोर्ट या खेळाची सुद्धा पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत.

त्यांचे काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे शाळेचे प्राचार्य गणेश पाटील शाळेच्या समन्वयीका स्वाती अहिरराव ,संगीता तळेले ,अनघा सागळे तसेच जिल्हा महासंघाचे सचिव राजेश जाधव यांनी कौतुक केले

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com