उर्दु शाळेलगतचे अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलन

उर्दू शाळेच्या अतिक्रमणाचा मुद्दा तापला
उर्दु शाळेलगतचे अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलन

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव येथील घाटरोडवर नगर परिषद उर्दू शाळा नंबर १ व ३, नागद रोड व अँग्लो उर्दू हायस्कूल येथे शाळा मालकी परिसराच्या जागेचे मोजमाप करून हद्द व खुल्या निर्धारित कराव्यात. त्यानंतर शाळा हद्दीतील व हद्दी लगतचे असलेले अतिक्रमण तात्काळ काढून विद्यार्थ्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी जागा रिकामी करुन द्यावी, यासाठी शिवसेने अल्पसंख्यांक शहरप्रमुख शेख वसिम शेख रज्जाक यांच्यासह अनेक जण गेल्या चार दिवसांपासून चाळीसगाव तहसीलसमोर उपोषणास बसले आहे. परंतू तरी देखील नगरपरिषदेकडून अतिक्रमण काढण्यात येत नसल्याने आज(दि,२) शाळेतील विद्यार्थ्यांसह उपोषणकर्त्यांनी नगरपरिषदेसमोर थाळीनाद आंदोलन केले. तसेच विविध मागण्याचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकार्‍यांना देण्यात आले. या आंदोलनामुळे आता उर्दू शाळेच्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषद उर्दू शाळा नंबर १ व ३, नागद रोड व अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत शाळा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालेले आहे. यामुळे येथील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील दुकानदार व इतरही नागरिक या शाळेच्या प्रांगणात लघुशंका करतात, यामुळे विद्यार्थिनींना रोजच लज्जा निर्माण होते. तसेच शासन नियमानुसार या शाळा परिसराच्या शंभर मीटर अंतरात कुणीही घटका सिगारेट व इतर मद्द्या पदार्थ विक्री करू नये. या ठिकाणी सर्वच अवैध व बेकायदेशीर धंदे यांना ऊत आला आहे. याकडे स्थानिक पोलीस प्रशासन यांनीही यावर तत्काळ कारवाही केली पाहिजे. शिक्षनासारखे पवित्र क्षेत्र अतिक्रमांच्या आयुष्यात आहे. ही लाजिरवाणी व खेदजनक बाब आहे स्थानिक नेते व पुढारी अतिक्रमणाला विरोध करण्याऐवजी स्वतःच अतिक्रमण करतात व अतिक्रमणकर्त्याची यथाशक्ती पाठराखण देखील करतात. या अति संवेदनशील विषयाचे आपण तात्काळ दखल घेऊन कायद्यानुसार शाळा हद्दीतील व परिसरातील झालेले अतिक्रमण आपण तात्काळ निष्काशीत करावे. अनेक वेळा दिलेल्या तक्रारी व निवेदनाची दखल न घेतल्यामुळे शिवसेनेचे शेख वसिम शेख रज्जक यांच्या अनेक जण दिनांक २५/५/२०२३ गुरुवार पासून तहसील कार्यालय समोर सामुहिक साखळी उपोषणास बसले आहेत. परंतू तरी देखील यांची दखल न घेतल्यामुळे शुक्रवारी शाळेच्या विद्यार्थांसह उपोषणकर्त्यांनी नगरपरिषदेवर मोर्चा नेत थाळीनाद आंदोलन केले. या मोर्चात मोठ्या संख्येने शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com