पेन ड्राईव्ह बॉम्बनंतर घेतले मविप्रच्या संचालकांचे जबाब

पेन ड्राईव्ह बॉम्बनंतर घेतले मविप्रच्या संचालकांचे जबाब

सीबीआयच्या पथकाचा शहरात आठवडभराचा मुक्काम

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याशी संबंधित दिल्ली येथील केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)चे (Central Bureau of Investigation (CBI) team) पथक जळगावात दाखल झाले आहे. या पथकाडून गुन्ह्यांशी संबंधित ठिकाणी जावून पाहणी केली. मविप्र संस्थेतील संचालकांसह (directors) कर्मचार्‍यांचे चौकशी (inquiry) करुन जाबजबाब नोंदविण्यात आले. तसेच हे पथक आठवडाभर जळगावात तळ ठोकून राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठा विद्या प्रसारक संस्थेचा ताबा घेण्यासाठी तसेच संचालकांचे राजीनामे घेण्यासाठी अ‍ॅड. विजय पाटील यांचे अपहरण करुन त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी दि. 8 डिसेंबर 2020 रोजी निंभोरा पोलीस ठाण्यात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता.

याप्रकरणात तत्कालीन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडून मंत्री गिरीश महाजन यांचविरुद्ध गुन्हे कसे दाखल करुन त्यांना कस फसवल, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांना कस फसवायच आहे या सर्व गोष्टींचे चित्रीकरण या पेनड्राईव्हमध्ये असल्याने तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी रचलेला कट उधळून लावला होता. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतरण होवून य प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक शुक्रवारी रात्री जळगावात दाखल झाले आहे.

स्थानिक पोलिसांच्या वाहनाचा वापर

जळगावात दाखल झालेले चार जणांचे सीबीआय पथकाने जळगाव पोलिसांच्या वाहनाने जावून या गुन्ह्याशी संबधित असलेल्यांची चौकशी करुन त्यांचे जाबजबाब नोंदवित आहे. त्यांनी आज दुपारी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयात जावून पाहणी केली. तसेच त्याठिकाणावरील कागदपत्रांची तपासणी केली आहे.

संस्थेच्या चेअरमनसह संचालकांचे नोंदविले जबाब

संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांचा जबाब यापुर्वीच पुण्यात घेतलेला आहे. दरम्यान, संस्थेच्या कार्यालयात कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पथकाने संस्थेचे चेअरमन गोकुळ पितांबर पाटील, विरेंद्र भोईटे, अलका पवार, शिवाजीराव भोईटे, परमानंद साठे, जयवंत येवले, जयंत देशमुख यांच्यासह इतर संचालक व कर्मचार्‍यांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदविले. यावेळी मानद सचिव निलेश भोईटे उपस्थित होते.

आठवडा भर तळ ठोकून

या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांची पाहणी करुन संबंधितांशी चौकशी करण्यासाठी सीबीआयच्या चार जणांचे पथक जळगावात दाखल झाले आहे. गुन्ह्यांशी संबंधित असलेले पुराव्यांसह जबाब नोंदविण्यासाठी हे पथक आठवडाभर जळगावात तळ ठोेकून राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com