
पहूर , Pahoor ता . जामनेर ( प्रतिनिधी )
वीटभट्टीवर काम करणाऱ्या पती-पत्नीच्या (husband and wife) भांडणात पडून वीट भट्टीच्या मालकाने (owner brick kiln) मजुराचा (labour) खून (murder)केल्याची खळबळजनक घटना ढालशिंगी ( ता . जामनेर ) येथे घडली .याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात वीट भट्टी मालकाविरुद्ध गुन्हा (crime) नोंदविण्यात आला आहे .
याबाबत शाहरुख रशीद तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , लहानु चांदखा तडवी ( वय २५ ) हा तरुण त्याची पत्नी व मुलाबाळांसह तोंडापूर ते ढालसिंगी दरम्यान हर्षल भारत पवार यांच्या वीट भट्टीवर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात .
दरम्यान काल १५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास लहानु तडवी मरून पडलेल्या अवस्थेत असल्याच्या आलेल्या फोनवरून प्रत्यक्ष घटनास्थळी गेल्यावर वीट भट्टी जवळ लहानुचा मृतदेह आढळला .वीट भट्टी मालक हर्षल पवार याने हातातील काठीने लहानु तडवी यांस मारहाण केल्याने तो पडला आणि त्याच्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे . पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले . मृतदेह ग्रामीण रुग्णालय पहुर येथे आणण्यात आला .
मृतदेह लिंबाच्या झाडाजवळ टाकला अन् आणला खाटेवर
पती-पत्नीचे भांडण सुरू असताना वीट भट्टी मालक हर्षल पवार याने हातातील काठीने लहानू तडवी याच्या डोक्यावर , छातीवर मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्याचे फिर्यादीने म्हटले असून या मारहाणीतच लहानुचा मृत्यू झाला .या मारहाणी नंतर हर्षल ने तोंडापूर येथे डॉक्टरांकडे नेले . मात्र लहानू मृत्यूमुखी पडला असल्याने त्याला लिंबाच्या झाडाजवळ टाकले , त्यानंतर वीट भट्टी जवळील खाटेवर मृतदेह आणून सोडला . प्रथमदर्शनी नैसर्गिक मृत्यू झाला असे भासविण्याचा प्रयत्न झाला मात्र अखेरीस संबंधित संशयीताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे .या घटनेमुळे तोंडापूर ढालशिंगी शिवारात खळबळ उडाली आहे .