अपहरण झालेल्या त्या तरुणाचा खून

गळा आवळून मृतदेह मध्यप्रदेशातील जंगलात पुरला; दोघांना अटक
अपहरण झालेल्या त्या तरुणाचा खून

जळगाव- jalgaon

तालुक्यातील रायपूर (Raipur) येथील भूषण जयराम तळेले हा ३४ वर्षीय तरुण बेपत्ता (young disappeared) झाला होता. त्याच्याच मित्रांनी त्या तरुणाचा खून (Murder) करून त्याचा मृतदेह (Corpses) मध्यप्रदेशातील जंगलात पूरल्याची (Buried in the forest) धक्कादायक घटना समोर आली आहे. खून करणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक (Suspects arrested) केली आहे. त्या दोघांनी आज ज्या ठिकाणी मृतदेह पुरला आहे ते घटनास्थळ पोलिसांना दाखवले असून त्या ठिकाणाहून त्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

मूळचा मध्यप्रदेशातील भुषण जयराम तळेले (वय-३४) रा. ह. मु. रायपूर ता. जि.जळगाव हा तरूण कामानिमित्त रायपूर येथे आपल्या पत्नी आशा यांच्यासह स्थायीक झाला होता. चटईच्या कंपनीत (company of the mat) काम करणाऱ्या भुषणला नवीन काम मिळवून देण्याचा बहाणा करुन भिकन परदेशी आणि विठ्ठल परदेशी या दोघांनी संगनमत करून दि. १७ एप्रिल रोजी भूषणला दुचाकीवर बसवून भुसावळला घेऊन गेले.

भुसावळात तिघे दारू पिल्यानंतर (drinking alcohol) पुन्हा मुक्ताईनगर तेथे तीघे जण दारु प्यायले. त्यानंतर तिघे मध्यप्रदेशातील नेपानगर परिसरातील एका जंगलात गेले. तिथे भूषणच्या गुप्तांगावर मारहाण केली त्यानंतर दोरीने गळा आवळून खून (Murder) केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जवळ असलेल्या नाल्यात पुरला. त्यानंतर ते दुचाकीने रायपूर येथे आले आणि याठिकाणी जसे काही घडलेच नाही असे राहू लागले.

त्यानंतर संशयित आरोपींनी वेगवेगळ्या नंबरवरून भूषणच्या पत्नीला फोन करून वेगवेगळ्या गावांची नावे सांगून भुषण सोबत असल्याचे सांगीतले. त्यानंतर अनेक दिवस झाल्यानंतर पती घरी न असल्याने महिलेने पोलीसांकडे (police) तक्रार दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला.

अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फिरली तापसचक्रे

पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली. भिकन पोलिसांनी श्यामसिंग परदेशी व विठ्ठल प्रेमसिंग परदेशी दोन्ही रा. रायपूर या दोघांना ताब्यात घेतले. पोलीसांनी खाक्या दाखविताच दोघांनी आपणच भूषणचा खून करून त्याचा मृतदेह जंगलात पुरल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्यावर वाढीव कलम लावण्यात आले आहे.

मृतदेह बाहेर काढताच नातेवाईकांचा आक्रोश

पोलीसांनी दोन्ही संशयितांसोबत घेवून नेपानगर परिसरातील जंगल गाठले. खून केल्याची घटना आणि भूषणचा मृतदेह पुरल्याची जागा देखील दाखविली. भूषणचा पुरलेला मृतदेह बाहेर काढताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com