
चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी
तालुक्यातील मेहुणबारे येथील गिरणा विद्यालया (Girna Vidyalaya) जवळ एक ४० वर्षीय इसमाच्या मानेवर लोखंडी कोयत्याने वार करुन त्याचा निघून खून (murder) करण्यात आला आहे.
हि घटना आज दुपारी ११ वाजेच्या सुमारास घडली असून पोलिस (police) स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दिवसाढवळ्या घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडली आहे. दगडू वामन गढरी (वय-४५) रा. मेहुणबारे ता. चाळीसगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा खून कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप समजू शकले नाही. मानेवर सपासप वार करून मारेकरी पसार झाले आहे. घटनेची माहिती मिळल्यानंतर मेहुणबारे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.