
रावेर|प्रतिनिधी raver
तालुक्यात निमड्या येथे ३२ वर्षीय तरुणांचा खून झाल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार सातपुड्यातील निमड्या या आदिवासी भागातील गावापासून काही अंतरावर तरुणांचा खून झाला.
ही घटना दि.८ शनिवारी सकाळी उघडकीस आली. खून झालेल्या तरुणाचे नाव संजय बरेला (वय ३२) असल्याची माहिती मिळत आहे. खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून घटना स्थळी फैजपूर उपविभागीय अधिकारी डॉ कुणाल सोनवणे, रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे सह पोलीस कर्मचारी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.