१३० रुपयांच्या उधारीसाठी झालेल्या खुनाचा मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

१३० रुपयांच्या उधारीसाठी झालेल्या खुनाचा मारेकरी पोलिसांच्या ताब्यात
मयत भीमसिंग पवार

रावेर|प्रतिनिधी raver

पान टपरीच्या १३० रुपये उधारीवरून वाद झाल्याने गुप्तांग पिळून तरुणाचा (murder) खून झाल्याची घटना ऐनपुर (ता.रावेर) (raver) येथील रामदेव बाबा (वाल्मिक नगर) येथे गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली होती. भीमसिंग जगदीश पवार (वय २८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. यातील आरोपीला निंभोरा (police) पोलिसांनी अटक केली आहे.

मयत भीमसिंग पवार
४८ तासात लावला मोटारसायंकल चोरट्यांचा छडा
पन्नालाल कोरकू संशयीत आरोपी
पन्नालाल कोरकू संशयीत आरोपी

पन्नालाल कोरकू याची टपरी असून, त्याचे उधारीचे १३० रुपये भीमसिंग पवार याच्याकडे बाकी होते. गुरुवारी भीमसिंग फिरत असताना ते उधारीचे पैसे देण्या- घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यात पन्नालाल कोरकू (वय ५५) याने भीमसिंग पवार यांचे गुप्तांग पिरगळून टाकले. भीमसिंगला तत्काळ रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.

घटनेनंतर यातील आरोपी पन्नालाल कोरकू फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेत धमोडी शिवारातून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी (Faizpur Divisional Police) फैजपूर विभागीय पोलिस भेट दिली होती. या गुन्ह्याचा तपास निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ याच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी, स्वप्नील पाटील, अब्बास तडवी करत आहेत.

Related Stories

No stories found.