पैशांसाठी वृद्ध महिलांना हेरुन गळा आवळून करायचा खून

पैशांसाठी वृद्ध महिलांना हेरुन गळा आवळून करायचा खून

तीन जणांच्या खुनाची कबुली; किनगाव येथून संशयिताला अटक

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गावातील वृद्ध महिला (Older woman) घरी एकट्यात (alone at home) राहत असल्याचे हेरायचा. त्यानंतर त्या वृद्धा घरात एकट्याच असल्याची संधी सधत त्यांचा रुमालाने गळा आवळून (strangulation with a handkerchief) खून (Murder) करुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने (Gold jewelry) लांबविणारा सिरीयल किलर मुकूंदा उर्फ बाळू बाबुलाल लोहार (Serial killer Balu Babulal Lohar) (वय-30, रा.चौधरीवाडा, किनगाव ता. यावल) याच्या एलसीबीने (LCB) मुसक्या आवळल्या. घटनास्थळहून मिळालेल्या चप्पल व रुमालावरुन पोलिसांना संशयिताच्या मुसक्या आवळण्यात यश आले. त्याची चौकशी सुरु असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किनगावातील रामराव नगरात राहणार्‍या मराबाई सखाराम कोळी (वय-70) ही वृध्द महिला घरी एकटीच राहत होती. दि. 23 मे रोजी त्या महिलेचा काळ्या रुमालाने गळा आवळून त्या महिलेच्या अंगावरील दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वृद्धेस तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी यावल पोलिसात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या महिलेवर उपचार सुरु असतांना दि. 2 जून रोजी तीचा मृत्यू झाला. या गुन्हयात खूनाचे कलम वाढविण्यात आले होते. या घटनेचे गांभीर्य राखत संशयिताचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून तपासाच्या सूचना दिल्या होत्या.

चपलेवर सिरीयल किलर गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करीत असतांना त्यांना घटनास्थळहून एक चप्पल व रुमाल मिळून आला. दरम्यान, ती चप्पल कोणत्या डिलरकडून कुठल्या दुकानात वितरीत झाल्याची माहिती पथकाने घेतले. या एका पुराव्याची संपुर्ण माहिती काढत त्याठिकाणारील तांत्रिक पुराव्याच्या आधारावरुन गावातीलच वेल्डींगचे काम करणार्‍या मुकूंदा उर्फ बाळू लोहार याच्या मुसक्या आवळल्या. त्याला खाक्या दाखविताच त्याने आपणच तीन वृद्धांचा खून करुन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लुटल्याच कबुली दिली.

रेशनचे धान्य घरी नेवून देत केली खात्री

सहा ते सात महिन्यांपुर्वी गावातील वृद्ध महिला मराबाई कोळी या रेशन घेण्यासाठी गेल्या असता, त्यांच्याकडे रेशनचे धान्य जास्त असल्याने मुकुंदा उर्फ बाळूने त्या वृद्धेला धान्य घरी पोहचवून दिले होते. यावेळी त्या वृद्धेला हेरुन ती घरी एकटीच राहत असल्याची खात्री करुन तीचा निर्घुन खून केला.

नागरिकांमुळे झाली नाही घटनेची वाच्यता

अशीच घटना गेल्यावर्षी घडलेली असल्याने पोलिसांनी सिरीयल किलर मुकूंदा याची कसून चौकशी केली असता, दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजी गावातील चांभारवाड्यातील द्वारकाबाई चैत्राम सुरवाडे (वय-70) ही महिला घरी एकटीच राहत होती. गावात रात्रीच्या सुमारास लाईट गेल्याचा फायदा घेत मुकूंदा याने वृद्धेच्या घरात घुसून रुमालाने गळा आवळून खून केला. त्यानंतर वृद्धेच्या अंगावरील आणि घरातील पेटीचे कुलूप तोडून महिलेला मिळालेल्या पेन्शनचे पैसे लुटले होते. या घटनेची नातेवाईकांनी वाच्यता न केल्याने पोलिसात कुठलीही नोंद झाली नव्हती.

गावात खून मात्र पोलिसात नोंद केवळ अकस्मात मृत्यूची

गावातील चौधरी वाड्यात ज्या वेल्डींगच्या दुकानात काम करतांना त्या दुकानाशेजारी राहणारी रुखमाबाई कडू पाटील (वय-70) ही महिला घरात एकटी राहत होती. ही संधी साधत दि. 19 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारच्या सुमारास त्या महिलेच्या घरात घुसून तीचा गळा आवळून खून करीत तीच्या अंगावरील दागिने चोरुन नेले होते. वृद्धेचा संशयास्पद मृत्यू झालेला असतांना देखील पोलिसांनी त्याची चौकशी न करता केवळ अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, कर्तव्यात कसूर करणार्‍या संबंधित पोलीस उपनिरीक्षकाकडून या गंभीर प्रकरणाचा खुलासा मागविण्यात आला आहे.

शवविच्छेदनाचा अहवालच महत्वाचा पुरावा

गावातील द्वारकाबाई सुरवाडे व रुखमाबाई यांचा संशयास्पद मृत्यू झालेला असतांना पोलिसांनी हलगर्जीपणा करीत संबंधित प्रकरणाची चौकशी केली नाही. त्यामुळे संशयीत मुकंदा लोहार याच्यावरील दाखल असलेल्या गुन्ह्यात दोन खुनाचे कलम वाढविण्यात आले. यात आता शवविच्छेदन अहवालच महत्वाचा पुरावा ठरणार असून त्यानुसार पोलिस पुढील कार्यवाही करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

या पथकाची कामगिरी

हा गुन्हा एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ वसंत लिंगायत, युनूस शेख, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, सुनिल दामोदरे, दिपक पाटील, संदिप सावळे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, राहुल पाटील, ईश्वर पाटील यांनी उघडकीस आणला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com