अनैतिक संबंधातुन सावखेडा येथे खून

अनैतिक संबंधातुन सावखेडा येथे खून

संशयित पोलिसांच्या ताब्यात

जळगाव :jalgaon

तालुक्यातील सावखेडा (Savkheda) येथे श्रावण लालचंद भील (Shravan Lalchand Bhil) उर्फ सोनवणे (वय ४०, रा. सावखेडा) याचा डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून (Murder) झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता घडली. अनैतिक संबंधाच्या (immoral relationship) संशयावरुन हा खुन झाल्याची माहिती मिळाली असुन खून करणारा भैय्या मदन पावरा (वय २८, रा.मडगाव,जि.सेंधवा,मध्य प्रदेश) याला पोलिसांनी( police) ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत श्रावण याचे भैय्या याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते, असा संशय ताब्यात घेतलेला संशयित भैय्या याला होता. त्यामुळे भैय्या याने तीन दिवसांपूर्वीच पत्नीला सासूसोबत गावाला पाठवून दिले होते. बुधवारी रात्री साडे नऊ वाजता दोघे जण गावाच्या बाहेर सोबत मद्यप्राशन करीत होते. तासाभरात दोघांमध्ये वाद झाला. त्यातून भैय्या पावरा याने डोक्यात असलेल्या रागाच्या भरात श्रावणच्या डोक्यात कुर्‍हाड मारली. त्यात श्रावण हा जागीच ठार झाला.

भैय्या हा पोलीस पाटील उत्तम दगडू चौधरी यांच्याकडे एक वर्षापासून कामाला होता. श्रावण याचा खून केल्यानंतर भैय्या हा थेट पोलीस पाटलांच्या घरी आला व झाल्या प्रकाराची माहिती दिली. काही वेळाने या घटनेची गावभर चर्चा झाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे काम सुरु होते.

Related Stories

No stories found.