रावेरात सुपर स्प्रेडर ठरत असलेल्या शॉपिंग मॉलवर पालिका पथकाची मोठी कारवाई

संचारबंदीच्या काळात दुकानात निघाले तब्बल २५० ग्राहक: पालिकेकडून दुकान सील
रावेरात सुपर स्प्रेडर ठरत असलेल्या शॉपिंग मॉलवर पालिका पथकाची मोठी कारवाई

रावेर | प्रतिनिधी Raver

येथील स्टेशन रोडवर भुसावळ येथील व्यापाऱ्यांच्या रुपम कापड मॉलमध्ये संचारबंदीच्या काळात प्रंचड गर्दी झाल्याची बातमी पालिकेच्या पथकाला मिळाली असता, दुकान मालकाने पथकास दंडाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने, पथकातील अधिकारी दुकानात शिरले असता, त्यांना प्रंचड गर्दी आढळून आल्यावर याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देण्यात आली असता पालिका, महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले,यानंतर आता बसलेल्या तब्बल २५० जणांना बाहेर काढण्यात आले.

रावेरात सुपर स्प्रेडर ठरत असलेल्या शॉपिंग मॉलवर पालिका पथकाची मोठी कारवाई
दस्त नोंदणीसाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल आवश्यक

शॉपिंग मॉलमध्ये जाण्यासाठी चोरटा मार्ग तयार करण्यात आला असल्याने,अधिकार्यांनी या प्रकरणी चौकशीसाठी दुकातानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.दुकानात मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी कोरोनाला आयते आमंत्रण देण्यासारखे असून,सदरील ठिकाण सुपर स्प्रेडर ठरत असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी देशदूत शी बोलताना दिली आहे. येथील पीपल्स बँकेजवळ भुसावळ येथील कापड व्यापाऱ्यांचे रुपम शॉपिंग मॉल दुकानं आहे.

सकाळी ११ वाजेपासून संचारबंदी सुरु झाल्यावर,यादुकानात गर्दी असल्याची माहिती पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यावर पथकाच्या तपासणीत तब्बल २५० ग्राहक मिळून आल्याने,एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती पथकाने मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना दिल्यावर ते तातडीने या ठिकाणी हजर झाले.

रावेरात सुपर स्प्रेडर ठरत असलेल्या शॉपिंग मॉलवर पालिका पथकाची मोठी कारवाई
दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांच्यावर

त्यांच्या नंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तहसीलदार उषाराणी देवगुणे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे देखील या ठिकाणी हजर झाले.दुकानातील सर्व महिला व पुरुष अशा २५० ग्राहकांना बाहेर काढण्यात आले.या नंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन,दुकान सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.याबाबत कायदेशीर दंडात्मक कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली.

मै करोडपती हु....मुझे जरुरत नाही कारवाई वेळी अधिकारी दुकानात पोहचल्यावर दुकान मालकाने मै करोडपती हु..मुझे जरुरुत नही है.लोगोके लिये दुकान चालू किया था अशी गर्विष्ठ भाषा वापरून अधिकाऱ्याचा अपमान केला, यावेळी पोलीस कर्मचारी भागवत धांडे यांनी मालकाचा यावर खरपूस समाचार घेतला.

रावेरात सुपर स्प्रेडर ठरत असलेल्या शॉपिंग मॉलवर पालिका पथकाची मोठी कारवाई
मास्कचा न वापरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट करा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com