
जळगाव । Jalgaon
जळगाव शहरातील सुरु असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे (Maharashtra Jeevan Pradhikaran) कार्यकारी अभियंता महादू गिरगांवकर (Executive Engineer Mahadu Girgaonkar) यांची जळगाव महानगरपालिकेत (Municipal Corporation) वर्षभरासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश बुधवारी जारी करण्यात आले आहे.
वसई- विरार मनपातून कार्यकारी अभियंता महादू गिरगांवकर ((Executive Engineer Mahadu Girgaonkar)) यांना कार्यमुक्त केल्यानंतर ते दि.8 जून 2022 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नवी मंबई येथील मध्यवर्ती कार्यलयात रुजू झाले होते.शासन निर्णयानुसार पदस्थापना देणे आवश्यक असल्याने गिरगांवकर यांनी विनंती अर्ज दिले होते.
तसेच जळगाव मनपा आयुक्तांनी देखील मनपा हद्दीत विकास कामे सुरु असून ही कामे तांत्रिकदृष्टया महत्त्वाची असल्याने कामाची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे. त्याकरीता नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता(स्थापत्य) यांची प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्याबाबत शासनाकडे विनंती केली होती. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता महादू गिरगांवकर यांची जळगाव महानगरपालिकेत वर्षभरासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.