मनपाचे शाखा अभियंता निलंबित

jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporation

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

प्रभाग क्र. 17 अंतर्गत कामांच्या अंदाजपत्रक मंजुरीसाठी (budget approval of works) प्रत्यक्ष स्थळ पाहणी (Actual site inspection) दरम्यान, पुर्व कल्पना असतांनाही अनुपस्थित राहिल्याने (due to absence) महापालिकेचे (Municipal Corporation due to absence) शाखा अभियंता (Branch Engineer) जितेंद्र रंधे यांना आयुक्त डॉ.विद्या गायकवाड (Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांनी निलंबित (suspended) केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग प्रभाग क्र. 17 अंतर्गत कामांचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी प्रत्यक्ष कामाचे स्थळ निरिक्षण करण्यात येणार असून, शाखा अभियंता जितेंद्र रंधे यांना पूर्व कल्पना देण्यात आली होती. मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, शहर अभियंता एम.जी.गिरगावकर, सहाय्यक अभियंता सोनगिरे, शाखा अभियंता समीर बोरोले हे त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणीसाठी गेले होते.

यावेळी आयुक्तांनी रंधे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता, दिशाभुल करुन पाहणी दरम्यान, अनुपस्थित राहिले. त्यामुळे मनपा आयुक्त गायकवाड यांनी शाखा अभियंता जितेंद्र रंधे यांच्यावर शुक्रवारी निलंबनाची कारवाई केली.

दरम्यान, निलंबन कालावधीत शहर अभियंता कार्यालय हे त्यांचे मुख्यालय असून, पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. असेही निलंबन कारवाईच्या आदेशात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com