अतिक्रमण कारवाईसाठी मनपा आयुक्त रस्त्यावर

अतिक्रमण कारवाईसाठी मनपा आयुक्त रस्त्यावर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मनपा प्रशासनातर्फे (Municipal administration) टॉवर चौक ते ममुराबाद रोडपर्यंत अतिक्रमण निष्कासित (Encroachment removed) करण्याच्या कारवाईची मोहीम (Campaign of action) सोमवारपासून हाती घेतली आहे. मंगळवारी शनिपेठ परिसरात कारवाईसाठी थेट मनपा आयुक्तच (Municipal Commissioner) रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, अतिक्रमीत ओटे, पत्र्याचे शेड, व्यायाम शाळेची संरक्षण भिंत असे एकूण जवळपास 50 अतिक्रमण जेसीबीच्या माध्यमातून तोडण्यात आले.

शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम देखील हाती घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मनपा आयुक्तांनी मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोमवारपासून टॉवर चौक ते ममुराबादपर्यंत दोन्ही बाजूने अतिक्रमण निर्मुलनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मंगळवारी दुसर्‍या दिवशी शनिपेठ परिसरात सकाळी 11 वाजता मनपाचे पथक पोलीस बंदोबस्तात पोहचले. त्यानंतर काही क्षणातच आयुक्त सतीष कुलकर्णी यांनी स्वतः शनिपेठ परिसरात जावून पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरातील नगरसेवक चेतन सनकत यांच्याशी चर्चा केली.

Related Stories

No stories found.