
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
पावसाळ्यामुळे (rains ) साथीचे आजार (Epidemic) बळावण्याची शक्यता आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रभाग समिती कार्यक्षेत्राअंतर्गत (jurisdiction of Ward Committee) स्वच्छतेच्या कामाचे (Division of sanitation work) विभाजन करण्यात आले असून, त्यावर आता, प्रभाग अधिकार्यांचे नियंत्रण असणार आहे. कर्मचार्यांच्या रजेसाठी प्रभाग अधिकार्यांना तर आरोग्य निरीक्षकांचे रजेचे अधिकार उपायुक्तांसह सहा. आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहे. शहर स्वच्छतेचे तातडीने कामकाज पार पाडण्यासाठी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड (Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांनी या संदर्भात आदेश पारित केले आहे.
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सुसुत्रता आणने व कामाचा निपटारा जलद व्हावा यासाठी चारही प्रभाग समित्यांमध्ये कामांची विभागणी करण्यात आली आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेवून आरोग्य विभागाचे युनिट व तेथील कर्मचारी प्रभाग अधिकार्यांच्या अधिपत्याखाली कामकाज पाहतील तसेच सफाई कर्मचार्यांच्या रजा मंजुरीसाठीचे अधिकार प्रभाग अधिकारी तर आरोग्य निरीक्षकांचे रजेचे अधिकार उपायुक्तांसह सहा. आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहे.
नागरिकांच्या स्वच्छतेविषयक येणार्या तक्रारींची प्रभाग अधिकार्यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करावी असे आदेशदेखील प्रभाग अधिकार्यांना दिले आहे.