महापालिकेच्या वॉलमनला दोघांकडून मारहाण

दुचाकीचीही केली तोडफोड ः शहर पोलिसात गुन्हा दाखल
महापालिकेच्या वॉलमनला दोघांकडून मारहाण

जळगाव - jalgaon

पाणी सोडण्याच्या कारणावरुन महापालिकेचे वॉलमन उमाकांत संभाजीराव चव्हाण वय ५८ यांना दोघांनी मारहाण करुन त्याच्या दुचाकीची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी, दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिवाजीनगर हुडको येथे घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शाकसीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जनार्दन कोळी व गणेश (पूर्ण नाव माहिती नाही) या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पिंप्राळ्यातील रहिवासी उमाकांत चव्हाण हे वॉलमन असून ते शिवाजीनगर भाग हा त्यांच्याकडे येतो. त्यांचे सहकारी सलीम पठाण हे रजेवर असल्याने त्यांचाही पदभार चव्हाण यांच्याकडे असल्याने ४ दिवसांपासून चव्हाण हे हुडकोमध्येही पाणी सोडण्याचे काम करत आहेत. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चव्हाण हे त्यांच्या दुचाकीने एम.एच.१९.बी.के. ७०८९ या दुचाकीने शिवाजीनगर हुडको येथे पाणी सोडण्यासाठी जात असतांना त्यांना रस्त्यात जर्नादन कोळी व गणेश या दोघांनी अडविले. त्यानंतर तु पाणी लवकर सोड म्हणत चव्हाण यांन मारहाण करण्यास सुुरुवात केली. तसेच चव्हाण दुचाकीरुन उतरले असता, दोघांनी दुचाकीचीही तोडफोेड केली. घटनेने घाबरुन चव्हाण हे पळून गेले. त्यानंतर चव्हाण यांनी प्रकाराबाबत त्यांचे शाखा अभियंता सुनील तायडे यांना माहिती. दिली. जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर रात्री शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जगदीश मोरे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com