मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, स्वीय सहाय्यक यांना कोरोनाची बाधा

संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचे आवाहन...
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, स्वीय सहाय्यक यांना कोरोनाची बाधा

मुक्ताईनगर Muktainagar

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांना कोरोना ची लागण (Corona infection) झाली आहे. यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः आपल्या फेसबुक अकाउंट (Facebook account) वर माहिती (Information) दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी हे दोन दिवसांपूर्वीच हिवाळी अधिवेशन आटोपून मुक्ताईनगरात दाखल झाले. यावेळी त्यांना तब्येतीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी करून घेतली त्यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला.

या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतःला त्यांच्या फेसबुक अकाउंट वर नमूद केली व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी असे आवाहनही आमदारांतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान या वृत्तामुळे कार्यकर्त्यांना व मतदारसंघातील नागरिकांना धक्का बसला आहे .

आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोरोना काळात रुग्णांच्या सेवेसाठी अतिशय चांगली व्यवस्था केली होती त्यामुळे आमदार तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक हे लवकरच कोरोना आजारातून बाहेर पडतील अशी आशा सर्व कार्यकर्ते व चाहत्यांनी व्यक्त केली आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com