मुक्ताई- भवानी संवर्धन क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा

मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय
मुक्ताई- भवानी संवर्धन क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा

जळगाव- jalgaon
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील मुक्ताई-भवानी (Muktai- Bhavani) वनक्षेत्र अभयारण्य (Forest Sanctuary) म्हणून जाहीर करण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केली होती. अखेर आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत (cabinet meeting) निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुक्ताई-भवानी अभयारण्य जाहीर करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर (Muktainagar) तालु्क्यात असलेल्या वढोदा वनक्षेत्रात (Vadodara forest) वाघाचे अस्तित्त्व (Existence of tigers) आढळून आल्यानंतर सातपुडा बचाव समितीने (Satpuda Rescue Committee) या वनक्षेत्राचा व्याघ्र संवर्धन प्रकल्प (Tiger Conservation Project) करावा, अशी मागणी केली होती.

याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये मुक्ताईनगर येथिल सभेत मुक्ताई-भवानी वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. यासाठी एक तज्ञ समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या सदस्यांनी या वनक्षेत्रात पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर केला होता.त्यानुसार मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून मुक्ताई-भवानी (Muktai- Bhavani) अभयारण्य जाहीर करण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाने आज मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्राला अभयारण्य निर्मितीची घोषणा केली असून,गेल्या दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाला आता स्वल्प विराम मिळाला आहे.

निर्मिती नंतर एकत्रित पणे यावल आणि मुक्ताई भवानी (Muktai- Bhavani) व्याघ्र प्रकल्पाची (Tiger Conservation Project) निर्मिती करण्याची प्रक्रिया आता सुलभ होईल, डोलारखेड्यात गाभाक्षेत्र (Core Zone) निर्माण करून सर्व सभोवतालच्या वनक्षेत्रात आणि गावांमध्ये Buffer Zone निर्माण करून या गावांच्या आणि तेथील लोकांच्या सर्वंकष विकासाची योजना आखण्यात यावी,या अनुषंगाने शासकीय आणि अशासकीय स्तरावर विचार करून सर्वंकष योजना आणि आराखडा तयार करण्याची आता नितांत आवश्यकता आहे.

जळगाव जिल्ह्यातील वाघांचे संवर्धन आणि वन्यजीवांसाठी समृद्ध-विस्तृत वनक्षेत्र आणि सुरक्षित संचार मार्गाचे संवर्धन ही काळाची गरज आहे. या वनक्षेत्रात 10-12 वाघांचे अस्तित्व आहे , आणि हे वनक्षेत्र अंबाबरुआ अभयारण्यला (बुलढाणा) लागूनच आहे , अंबाबरुआतील जळगाव जामोद वनक्षेत्रा पर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्पचे बफर क्षेत्र ( बाह्य क्षेत्र ) आहे, जळगाव जामोद वनक्षेत्रापासून मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्र ( वढोदा) अवघे 29 किलोमीटर आहे, त्यामुळे मेळघाट मधून वन्यजीव विशेषत: वाघ मुक्ताई भवानी संवर्धन(Tiger Conservation Project) क्षेत्रामध्ये येत असतात.मुक्ताई-भवानी अभयारण्य जाहीर करण्यात आल्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.

मुक्ताई भावानी संवर्धन क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळणे ही अतिशय अभुतपूर्व घटना आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील वाघांना अधिकृत दर्जा मिळेल. संपूर्ण प. सातपूडा, आणि गौताळा अभयारण्य ज्ञान गंगा अभयारण्य अशा विस्तृत लॅन्डस्केपच्या सवंर्धनाचा आपण विचार केला पाहिजे. या अभयारण्याच्या घोषणेमुळे जळगाव जिल्ह्यात वाघ्य्र प्रकल्प निमार्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राजेंद्र नन्नवरे, संचालक पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळा, व्याघ्य्र अभ्यासक जळगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com