मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण भागासाठी ठरणार वरदान

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा दृढ विश्वास
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण भागासाठी ठरणार वरदान

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (Mukhyamantri Gram Sadak Yojana) ही ग्रामीण भागासाठी वरदान(boon for the countryside) ठरणार असल्याचा विश्वास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ‘दैनिक देशदूत’शी बोलतांना व्यक्त केला.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात जळगाव जिल्ह्यासाठी सन 2022-23 आणि सन 2023-24 या दोन वर्षांसाठी प्रत्येकी 50 असे एकूण 100 किलोमीटर रस्त्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या (District Planning Board) माध्यमातून दरवर्षी 37 कोटी म्हणजेच दोन वर्षांसाठी 74 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 369 कि.मी.च्या रस्त्यांसाठी 277 कोटी 50 लाखांचा निधी अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा (Mukhyamantri Gram Sadak Yojana) पहिला टप्पा यशस्वी झाला असून, दुसर्‍या टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते (Roads) खर्‍या अर्थाने कात टाकणार आहे. प्रत्येक किलोमीटरसाठी 75 लाख रुपयांच्या निधीची तरतूद असून मक्तेदारावर (Monopolist) पाच वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निश्चित केली गेली आहे. जिल्ह्यातील गावे आणि वाड्या-वस्त्यांची जोडणी करण्यासाठी ही योजना लाभदायक ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून, जळगाव जिल्ह्यात संबंधीत शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात येणार असल्याची ग्वाही नामदार पाटील यांनी यावेळी दिली.

राज्याच्या जलसंधारण महामंडळाकडून (Water Conservation Corporation) जिल्ह्यातील 173 गेटेड सिमेंट काँक्रिटच्या बंधार्‍यांसाठी 120 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच साठवण बंधार्‍यासाठी (Storage binding) इतक्या मोठ्या प्रमाणात निधीच्या कामांना मान्यता मिळाल्याने याचा शेतकर्‍यांना निश्चितपणे लाभ होणार आहे. पाणी हा कृषीचा आत्मा असून याचा संचय हा जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेतीला समृध्दीचा आयाम प्रदान करणारा ठरेल असा विश्वासदेखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

जलजीवन मिशनच्या माध्यमातून घरापर्यंत पाणी

पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल असा संकल्प केला आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येकाला घरपोच पाणी देण्याचे नियोजन केले आहे. सन 2024 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. या महत्वकांक्षी योजनेत जिल्ह्यातील 838 गावांसाठी तब्बल 926 कोटी 78 लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकरी हा आपल्या समाजाचा केंद्रबिंदू आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना हा याचाच एक भाग आहे. बळीराजाच्या ऋणातून उतरायी होण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com