
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न, घरफोडी, विनयभंग यासारखे 11 गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात (notorious) गुंड राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ (धोबी) (वय- 20, रा. पारधीवाडा, अमळनेर) (Amalner)याला स्थानबद्ध (MPDA action) करण्यात आले असून त्याला नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली.
अमळनेर पोलिस ठाण्यात राजेश उर्फ दादू निकुंभ याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, घरफोडी, आर्म क्ट, दुखापत असे एकूण 11 गुन्हे दाखल असून त्याच्यावर पोलिसांनी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर तो पुन्हा गंभीर गुन्हे करीत असल्याने अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता. अधीक्षक एम. राजकुमार यांनी पडताळणी करून सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे पाठविला. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी गुरुवारी राजेश याला स्थानबद्धतेचे आदेश दिले.
पथकाकडून गुंडाची नाशिक कारागृहात रवानगी
जिल्हाधिकार्यांनी राजेशवर स्थानबद्धची कारवाई केल्यानंतर पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधीक्षकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोउनि अनिल भुसारे, दीपक माळी, रविंद्र पाटील, किशोर पाटील, सिद्धार्थ शिसोदे, यूनूस शेख इब्राहिम, सुनिल दामोदरे यांनी संशयिताला ताब्यात घेवून त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.