शेगांव येथे १८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधीची जाहीर सभा 

खा.मुकुल वासनिक यानी केली पाहणी
शेगांव येथे १८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधीची जाहीर सभा 

शेगांव Shegaon प्रतिनिधी

दि.१८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी ( MP Rahul Gandhi' यांच्या जाहीर सभेच्या (public meeting) स्थळाची खासदार मुकुल वासनिक (MP Mukul Wasnik) यांनी  आज दुपारी पाहणी केली.

शेगांव येथे १८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधीची जाहीर सभा 
कार्तिकी पौर्णिमानिमीत्‍त केरळी महीला ट्रस्टचे कार्तिक स्वामी मंदीर दुपारनंतर दर्शनासाठी खुले

बाळापुर मार्गे येत असलेली ही यात्रा शेगाव बाळापुर रोडवरील वरखेड फाट्याजवळ दुपारच्या  विश्रांतीसाठी थांबणार असून तेथून ते शेगाव शहरात दाखल होणार आहेत. खासदार राहुल गांधी यांची 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी जाहीर सभा ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्या बाळापुर रोडवरील  शेतातील सभा स्थळाची काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार मुकुल वासनिक यांनी आज सहा नोव्हेंबर रोजी दुपारी पाहणी केली.

यावेळी त्यांच्या समवेत आमदार राजेश ऐकडे, जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, खामगाव मतदारसंघाचे काँग्रेस पक्ष नेते व प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील, संजय राठोड, रामविजय बुरुंगले,  डॉ स्वातीताई वाकेकर जयश्रीताई शेळके, दयाराम वानखडे,  शहर अध्यक्ष किरणबापू देशमुख  आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,.

शेगांव येथे १८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधीची जाहीर सभा 
फैजपूरला होणार भव्यदिव्य "समरसता महाकुंभ"

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com