Photos # वाहनचालकांनो बर्‍हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाने जाताय... तर हे फोटो पाहाच..

महामार्ग विभागाला खासदारांनी दिलेल्या शब्दाचाही पडला विसर
Photos # वाहनचालकांनो बर्‍हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाने जाताय... तर हे फोटो पाहाच..

चिंचोली Chincholi ता. यावल

ब-हाणपुर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील (Bahanpur Ankleshwar National Highway) यावल तालुक्यातील चिंचोली ते यावल (Chincholi to Yaval) या अठरा कि. मी.रस्त्याची खड्ड्यांनी अगदी चाळण (road is riddled with potholes) झाली असून मोठ्या मालवाहतूक धारकांना (cargo holders) गाडी कशी (How to drive) चालवायची असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या रस्त्याच्या दूरूस्तीसाठी (road repair) जि.प.सदस्यांनी (Members of Z.P) उपोषणही (Fasting too) केले होते. ते उपोषण खासदार रक्षाताई खडसे (MP Raksha Khadse) यांनी आश्वासन (assurance) देऊन सोडविले होते. मात्र महामार्ग विभागाला (Highway Department) खासदारांनी (MPs) दिलेल्या शब्दाचाही (Even of a given word) विसर (forgot) पडला असल्याचे चित्र या रस्त्यावरून दिसत आहे.

या रस्त्यावर चिंचोली ते यावल या १८ कि मी.रस्त्यावर अक्षरशः दहा ते बारा फुट रूंदी चे तर एक ते दिड फुटी खोल असे मोठ मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. साधी मोटरसायकल चालविणे ही मोठे जिकिरीचे झाले आहे. सावदा रावेर येथुन केळीने भरलेल्या असंख्य ट्रक याच मार्गाने मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात राज्यातून बाहेरच्या राज्यात जात असतात.

गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर जिवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत.अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असून मोठा अपघाताची शक्यता असल्याने झोपेचे सोंग घेतलेल्या बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारींना कधी जाग येणार  ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबधित रस्त्याच्या दुरूस्ती चे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी साकळी येथील जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण ही केले होते.

खा. रक्षाताई खडसेंनी आश्वासन देवून हे उपोषण सोडविले होते. पाच ते सहा दिवस होवून ही संबंधित अधिकाऱ्यांनी साधे खड्डे बुजविण्यासाठी कोणतीही हालचाल अजुन ही सुरू केलेली नाही . त्यामुळे खासदारांचा ही शब्द खाली जाणार काय ? त्यामुळे सांबावि च्या अधिका-यांनी निदान दहा दहा फुटांचे पडलेल्या खड्ड्यांत मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी परीसरातुन व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम मंजूर केलेले आहे व येत्या सहा महिन्यात या रस्त्याच्या भूमिपूजनाला आपण येणार असल्याचे गडकरी साहेबांनी सांगितले असले तरी मग सहा महिन्यांनी जर ह्या रस्त्याचे भूमिपूजन होणार असेल तर मग वर्षभर अजुन असाच खड्ड्यातून प्रवास करावा लागेल का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे गडकरी साहेबांनी रस्त्याचे भूमिपूजन होण्याच्या आधी संबंधित अधिकाऱ्यांना निदान रस्त्याची डागडुजी व मुरूम टाकून रस्त्याची दूरूस्ती करण्यासाठी आदेश काढावेत अशी मागणी ही परीसरातुन होत आहे. 

या रस्त्यावर झालेल्या खड्डे मुळे वाहनचालक व परीसरातील ग्रामस्थांमधून संतापाची लाटही निर्माण झाली आहे.  

नावरे नदीच्या पुलाजवळही मोठमोठे खड्डे पडले असून पुलाला संरक्षण कठडे नसल्याने व पूल अरुंद असल्याने त्या ठिकाणीही मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गिरडगाव( वाघोदा) जवळील पुलावर ही वळणावर दोन्ही बाजूंना खड्डे असून आजूबाजूने वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने त्या ठिकाणीही मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचप्रमाणे चुंचाळे फाट्याजवळ बांधण्यात आलेल्या नवीन पुलावरही पुलाची उंची कमी झाल्याने तिथे ही मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.

चिंचोली ते यावल अशा १८ किलोमीटर अंतरावर संपूर्ण रस्त्याची वाताहात झाली असून या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी. अशी मागणी तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामस्थांनी व वाहन चालकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com