कंटेनरच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

मंगरूळ येथील घटना
Accident
Accident

अमळनेर Amalner

धुळ्याहून अमळनेर कडे जाणाऱ्या मोटरसायकल (Motorcycle) ला भरधाव जाणाऱ्या कंटेनर (container) ने धडक दिल्याने मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू (death) झाल्याची घटना २६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मंगरूळ गावाजवळ घडली. 

धुळे जिल्ह्यातील धाडरे येथील रहिवासी मनोहर बाळू पवार वय २३ हा आपल्या आई कल्पनाबाईसोबत मोटरसायकल क्रमांक एम एच १८ बी डब्ल्यू ३२४० ने धुळ्याहून अमळनेर कडे जात असताना पुढे चालणाऱ्या कंटेनरने एम एच ४६ ,ए एफ ७८४७ ने अचानक वळण घेतल्याने मोटरसायकल कंटेनरवर  धडकली.

मोटरसायकलवरून खाली पडून मनोहर जागीच ठार झाला तर कल्पनाबाई गंभीर जखमी झाल्याने तिला धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात  हलविण्यात आले. मनोहर चा चुलत भाऊ समाधान कैलास पवार याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून कंटेनर चालक सुरज रामसिंग जाधव रणाईचे तांडा ता अमळनेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com