शहरात मोटारसायकल चोरट्यांनी घातला धुमाकूळ

चार ठिकाणाहून दुचाकी लंपास; पोलीस प्रशासनासमोर आवाहन
शहरात मोटारसायकल चोरट्यांनी घातला धुमाकूळ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरात पुन्हा दुचाकी चोरट्यांनी (Two-wheeler thieves) हैदोस माजविला आहे. दररोज शहरातून तीन ते चार दुचाकी लंपास होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर (efficiency of the police) आता प्रश्न उपस्थित होवू लागले आहे. दरम्यान, शुक्रवारी शहरातून चार दुचाकी लांबविल्याची घटना उघउकीस आल्याने पोलिसांची गस्त(Police patrol) वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होवू लागली आहे.

शहरातील रामेश्वर कॉलनीतील संतोष माधवगिरी गोसावी (वय- 42) हे ट्रक चालक आहेत. शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ते त्यांच्या (एम.एच.19. डी.सी.6681) क्रमांकाच्या दुचाकीने गुजराल पेट्रोल पंप परिसरात गेले होते. यावेळी दुचाकी(Two-wheeler) हॉटेल आदर्श जवळ उभी केली. काम आटोपून परतल्यानंतर त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून आल्याने संतोष गोसावी यांनी या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीत त्यांनी पवन प्रेमचंद पाटील रा. जळगाव यांनी दुचाकी चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक जितेंद्र तावडे हे करीत आहेत.

रेल्वे स्थानकाच्या भिंतीजवळून मोटारसायकल लंपास

खान्देश मिल परिसरातील रेल्वे स्टेशनच्या पार्कींच्या बाहेरील भिंतीजवळून राकेश मच्छिंद बोरसे (एमएच 19 बीपी 3606) क्रमांकाची दुचाकी (Two-wheeler) चोरटयांनी लांबविल्याची घटना दि. 24 रोजी घडली. याप्रकरणी शहर पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजकुमार चव्हाण हे करीत आहे.

घरातून चावी काढून दुचाकी घेवून चोरटा पसार

शहरातील दांडेकर नगरातील योगेश भगवानदास लाठी यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरातून चावी काढून दुचाकी(Two-wheeler) लांबविल्याची घटना दि. 13 ते 19 मे दरम्यान घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगणातून लांबविली दुचाकी

शहरातील यशवंत नगरात स्नेहल सोसायटी येथील सुधांशू अरविंद शितोळे या तरुणाची दि. 26 रोजी अंगणातून (एम एच 19 डीसी 5434) भरदिवसा दुचाकी (Two-wheeler) लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना विजय खैरे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com